Rohit Sharma: 'मी आणि विराट पुन्हा खेळायला येईन याची खात्री नाही'! रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे खळबळ; प्रेक्षकांचे मानले आभार

Rohit Sharma statement: ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच प्रभाव पाडणाऱ्या आणि शतकेही करणारा रोहित शर्मा कदाचित ऑस्ट्रेलियात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असावा.
Rohit Sharma, Virat Kohli
Rohit Sharma, Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच प्रभाव पाडणाऱ्या आणि शतकेही करणारा रोहित शर्मा कदाचित ऑस्ट्रेलियात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असावा. माझ्यासह विराट कोहलीचाही हा कदाचित अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असावा, अशी शक्यता त्याने जाहीरपणे बोलून दाखवली.

रोहित आणि विराट आता केवळ एकदिवसीय प्रकारात खेळत आहेत. या वेळी ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिकेत खेळायला येतानाच मुळात त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्यामुळे यापुढे ऑस्ट्रेलियात नाही येणे, अशीच भावना त्यांच्या मनात तयार झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात या दोघांनी नाबाद १६८ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. शतकवीर रोहित शर्मा तर सामन्यात सर्वोत्तम ठरला.

ऑस्ट्रेलियाचा दौरा करणे आणि येथे येऊन खेळणे हा आनंद फारच वेगळा असतो. २००८ पासून मी ऑस्ट्रेलियात खेळत आहे; पण आता पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळायला येईन याची खात्री नाही; पण जे काही येथे खेळलो त्याचा आनंद मोठा आहे, असे रोहितने सांगितले.

विराट आणि मी जवळपास सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत होतो. त्यामुळे पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आम्हाला नव्याने सुरुवात करायला लागली; परंतु ऑस्ट्रेलियात खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक असते, असे रोहित म्हणाला.

Rohit Sharma, Virat Kohli
Ind vs Aus 3rd ODI: अखेर 'रो-को'चा जलवा! तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय; रोहित- विराटची धुंवाधार फलंदाजी

ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आणि त्यांचे दर्जेदार गोलंदाज यांच्यासमोर फलंदाजी करणे सोपे नसते. या वेळी आम्ही मालिका जिंकू शकलो नाही; परंतु अनेक गोष्टी सकारात्मक घडल्या. हा संघ नवा आहे, त्यांच्यासाठी चांगला अनुभव मिळाला, असे रोहितने सांगितले.

मी जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा संघातील सीनियर खेळाडूंनी आम्हाला मदत केली त्याचा फायदा निश्चितच झाला. आता नवोदितांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. स्वतःचा गेमप्लान तयार करणे आणि मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे मी अजूनही करत असतो, असे रोहितने सांगितले.

Rohit Sharma, Virat Kohli
IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

प्रत्येक सामना शिकवणारा, कोहली

प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी प्रत्येक सामना नवा असतो आणि नवे धडे देणारा असतो, त्यामुळे अशा परिस्थितीतून सर्वोत्तम खेळ करण्याचा मी प्रयत्न करत असतो, रोहितसह खेळताना आम्ही परिस्थितीते आकलन करतो आणि त्यानुसार खेळत असतो, असे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले.

रोहित आणि माझी जोडी क्रिकेट विश्वातील कदाचित सर्वात अनुभवी जोडी असेल; पण नवोदित असतानाही प्रतिस्पर्ध्यांच्या हातून सामना कसा घेऊन जायचा असा खेळ आम्ही त्या वेळीही करत असायचो. २०१३ पासून मी ऑस्ट्रेलियात खेळत आहे. आजच्या सामन्यातही आम्ही मोठी भागीदारी करण्यावर भर दिला, असे सांगत विराटने स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com