Goa Revenue: महसुली शिलकीत अव्वल राज्‍यांत गोव्‍याचाही समावेश! 2399 कोटींची रक्कम; ‘कॅग’ 23 अहवालातून माहिती समोर

Goa revenue statistics: २०२३ मधील महसुली शिलकीत अव्वल ठरलेल्‍या १६ राज्‍यांमध्‍ये गोव्‍यानेही स्‍थान पटकावले. यावर्षी राज्‍याची महसुली शिल्लक २,३९९ कोटी रुपये इतकी होती.
Goa revenue collection
Goa revenue collectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: २०२३ मधील महसुली शिलकीत अव्वल ठरलेल्‍या १६ राज्‍यांमध्‍ये गोव्‍यानेही स्‍थान पटकावले. यावर्षी राज्‍याची महसुली शिल्लक २,३९९ कोटी रुपये इतकी होती, असे महालेखापालांनी (कॅग) नुकत्‍याच जाहीर केलेल्‍या अहवालातून समोर आले आहे. यावर्षी देशातील २८ पैकी १२ राज्‍ये महसूल तुटीमध्‍ये गेली होती. त्‍यात गोव्‍याशेजारील महाराष्‍ट्राचाही समावेश आहे.

एका आर्थिक वर्षात विविध प्रकारचे कर, शुल्क, सेवा आणि इतर मार्गांनी मिळणारे उत्पन्न हे वेतन, निवृत्ती वेतन, अनुदाने, सार्वजनिक सेवा आणि इतर चालू खर्चांवर होणारा खर्च यापेक्षा जास्‍त असल्‍यास संबंधित राज्‍य महसुली अधिशेषात जाते.

तर, मिळणारे उत्‍पन्न खर्चापेक्षा कमी असते, तेव्‍हा राज्‍याला तुटीचा सामना करावा लागतो. महसुली शिल्लक हे राज्याच्या आर्थिक आरोग्याचे एक महत्त्वाचे सूचक असते. त्‍यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाची आणि व्यवस्थापनाची दिशा स्पष्ट होत असते. त्‍यामुळे प्रत्‍येक राज्‍य दरवर्षी महसुली शिलकीकडे अधिकाधिक लक्ष देत असते. गोवा सरकारनेही गेल्‍या काही वर्षात महसुली शिलकीवर गांभीर्याने लक्ष दिल्‍याचे २०२३ मधील आकडेवारीतून दिसून येते.

Goa revenue collection
GST Rates: गोव्‍यात 117 दुकानांची प्रत्‍यक्ष पाहणी, विक्रेत्‍यांनी लावले फलक; जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची होतेय अंमलबजावणी

दरम्‍यान, या आर्थिक वर्षात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्‍थान, पश्‍चिम बंगाल, पंजाब, हरयाणा, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, महाराष्‍ट्र आणि मेघालय ही राज्‍ये महसुली तुटीमध्‍ये गेल्‍याचेही ‘कॅग’ अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

Goa revenue collection
GST Rates: 'जीएसटी' दरकपात लागू करा, अन्‍यथा कारवाई करु! करखात्‍याचा इशारा; परिपत्रक जारी

महसुली शिलकीत अव्वल दहा राज्‍ये

राज्‍य शिल्लक (कोटींत)

उत्तर प्रदेश ३७,२६३

गुजरात १९,८६५

ओडिशा १९,४५६

ंझारखंड १३,५६४

कर्नाटक १३,४९६

राज्‍य शिल्लक (कोटींत)

छत्तीसगड ९,५९२

तेलंगण ५,९४४

उत्तराखंड ५,३१०

मध्‍य प्रदेश ४,०९१

गोवा २,३९९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com