Bengaluru Crime: कधी व्हायचा डॉक्टर तर कधी इंजिनियर; 9 वर्षांत भामट्याने बसवले 15 जणींशी घर

Bengaluru News: जर या 35 वर्षीय भामट्याचे इंग्रजी भाषेचे कौशल्य अधिक चांगले असते, तर त्याने अधिक संशयास्पद महिलांना आपल्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले असते.
Bengaluru News
Bengaluru NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru Man posed as an engineer or a doctor to marry 15 Women:

2014 पासून 15 महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या भामट्याला, म्हैसूर शहर पोलिसांनी नुकतेच तुमकुरू येथून अटक केली. महेश के बी नायक असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला म्हैसूर येथील एका सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचे या भामट्याशी लग्न झाले होते. महेश याच्याबाबत खरी माहिती समोर आल्यानंतर या तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

15 पैकी चौघींपासून मुले

सूत्रांनी सांगितले की, महेशने विवाह केलेल्या 15 महिलांपैकी चार महिलांना मुलं आहेत. यानंतर आणखी एका महिलेनेही आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे.

महेशने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर केला. पोलिसांनी सांगितले की, तो बहुतेक वेळा इंजिनियर किंवा डॉक्टर असल्याचे समोरच्यांना सांगायचा.

Bengaluru News
घटनाबाह्य ठरवलेला तृथीयपंथी कायदा काय आहे? सरकारला फटकारत हाय कोर्ट म्हणाले...

इंग्रजीने मोडला डाव

डॉक्टर असल्याच्या दाव्याला बळी देण्यासाठी महेशने तुमाकुरू येथे एक बनावट दवाखाना उभारत एक नर्सही ठेवली होती.

महेशला इंग्रजी बोलताना ऐकून अनेक महिलांनी त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. त्याच्या खराब भाषा कौशल्यामुळे अनेक महिला त्याचा बळी होता होता राहिल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Bengaluru News
PM Modi France Visit: नौदलाला मिळणार २६ राफेल-एम लढाऊ विमाने, पीएम मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावर होऊ शकते शिक्कामोर्तब

अनेक महिलांना प्रतिष्ठेची भीती

जानेवारी 2023 मध्ये आंध्र प्रदेशातील एका शहरात म्हैसूरच्या तरुणीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. दवाखाना सुरू करण्यासाठी त्याने तिला पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने तक्रार दाखल केली. तिने पैसे न दिल्याने त्याने तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.

महेश त्याच्या बायकांना क्वचितच भेटायचा. त्याने लग्न केलेल्या बहुतेक स्त्रिया सुशिक्षित आणि व्यावसायिक होत्या आणि त्यांच्या आर्थिक गरजांसाठी त्या त्याच्यावर अवलंबून नव्हत्या. या महिलांनी प्रतिष्ठेच्या भीतीने तक्रारीही दाखल केल्या नाहीत. असेही पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com