Bengaluru Water Crisis: ''....टॉयलेट वापरण्याच्या बहाण्याने लोक जातायेत मॉलमध्ये''; बंगळुरुमध्ये जलसंकट गडद

Bengaluru Water Crisis: इंटरनेट यूजर्संनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन या गोष्टी सांगितल्या आहेत. पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Bengaluru Water Crisis
Bengaluru Water CrisisDainik Gomantak

Bengaluru Water Crisis:

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये जलसंकट अधिक गडद होत चाललं आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक शॉपिंग मॉलमध्ये फिरायला जाण्याच्या बहाण्याने तिथल्या टॉयलेटचा वापर करत आहेत. होय, इंटरनेट यूजर्संनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन या गोष्टी सांगितल्या आहेत. पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

यावर तोडगा कधी निघेल किंवा अजून बरेच दिवस असेच जगावे लागेल का, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. 2023 मध्ये पावसाच्या कमतरतेमुळे, संपूर्ण कर्नाटक, विशेषत: बंगळुरु अलीकडील वर्षांतील सर्वात भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) कमी पावसाचे कारण अल निनोचा वाढता प्रभाव असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, जलसंकटाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, 'भाडेकरुंना त्यांच्या रुम सोडण्यास भाग पाडले जाते. टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठीही पाणी नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक शौचासाठी मॉलमध्ये जात आहेत आणि तिथेही रांगा लागल्या आहेत. जलसंकटाबाबत सोशल मीडियावर (Social Media) यूजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. X वर एका यूजरने सांगितले की, ''उन्हाळा नुकताच सुरु झाला असून बंगळुरुमध्ये जलसंकट अधिक गडद होत चाललं आहे. अशा परिस्थितीत मोफत बस किंवा मोफत विजेचा विचार करु नका.''

Bengaluru Water Crisis
Bengaluru Water Crisis: बंगळुरुत पाण्याचं संकट गडद, CM निवासस्थानीही पाणीटंचाई; सोसायट्या आकारतायेत 5000 हजारांचा दंड

लोक छोट्या शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत आहेत

काही लोकांनी पाण्याचे संकट कायम राहिल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बंगळुरुचे डेव्हलपमेंट मॉडेल फेल ठरु शकते. एका यूजरने लिहिले की, 'बंगळुरुमध्ये पाण्याची टंचाई आणखी वाढणार आहे. त्यामुळे मला 2 छोटे फ्लॅट घ्यायचे आहेत, एक मेट्रो शहरात आणि दुसरा छोट्या शहरात.

दुसरीकडे, जलसंकटाबाबत कर्नाटक (Karnataka) सरकारकडून पावले उचलली जात आहेत. जलसंकटावर मात करण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुरु करण्याचा निर्णयही सरकारक़डून घेण्यात आला आहे. गुरांना पुरेसा पाणीपुरवठा आणि चारा मिळावा यासाठी तालुकास्तरावर आमदारांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com