दुसरा किम जोंग हवाय का? राकेश टिकैतांचा युपी मतदारांना सवाल

जनतेने ठरवायचे आहे की त्यांना जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हवा आहे की...
Rakesh tikait
Rakesh tikait Dainik Gomantak
Published on
Updated on

शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचा उल्लेख करत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. ‘दुसरा किम जोंग हवाय का?’ हे मतदारांना ठरवावे लागेल, असे टिकैत म्हणाले.

"जनतेने ठरवायचे आहे की त्यांना जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हवा आहे की त्यांना किम जोंग उन सारखी परिस्थिती उत्तर कोरियामध्ये निर्णाण केली तशी परिस्थिती हवी आहे. आम्हाला कोणत्याही राज्यात हुकूमशाही सरकार नको. आम्ही लोकांना आवाहन करू इच्छितो की, लोकांनी आपल्या मताचा विवेकाने वापर करावा,असे आवाहन टिकैत यांनी मतदारांना केले आहे. निवडणूक काळात शेतकरी नेते उत्तर प्रदेशचे (UP Assembly Election) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत.

Rakesh tikait
"युवराजने 2014 मध्ये माझे हेलिकॉप्टर थांबवले": PM मोदींनी राहुल गांधींवर साधला निशाणा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी सांगितले होते की, 2013 मधील मुझफ्फरनगरमधील परिस्थिती आता बदलली आहे. इथे आता शांतता प्रस्थापित झाली आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणूक निकाल वेगळे असतील. तसेच, 2013 मध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यात उसळलेल्या जातीय दंगलीचा संदर्भ देत शेतकरी नेते राकेश टिकैत भाजपवर टीका केली.

Rakesh tikait
भारताचे स्विर्त्झलँड एकदा बघायलाच हवे; जिथे होते आझाद हिंद सेनेचे मुख्यालय

निवडणूक शांततेत पार पडली असून ही मोठी उपलब्धी असून त्याचा परिणाम सर्वांना दिसेल, असे टिकैत यांनी सांगितले. यापूर्वी टिकैत यांनी मतदारांना जातीयवादाचे कारण देऊन मतदान करू नये, असा इशारा दिला होता. पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी काल पहिल्या टप्प्यात मतदान झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यापैकी 50 जागा जिंकल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com