"युवराजने 2014 मध्ये माझे हेलिकॉप्टर थांबवले": PM मोदींनी राहुल गांधींवर साधला निशाणा

पंजाबमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधला.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. 2014 मधील घटनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, युवराज अमृतसरला जात असल्यामुळे पंजाबमध्ये माझे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले होते. (Prime Minister Narendra Modi Criticized Rahul Gandhi At A Rally In Jalandhar)

...म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी राहुल गांधींच्या सभेला मुकले2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर प्रचारासाठी पंजाबमध्ये (Punjab) गेलो असताना ही घटना घडल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंजाबमधील मतदानापूर्वी रविवारी जालंधरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पंतप्रधान उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मला प्रचारासाठी पठाणकोट आणि हिमाचलला प्रचारासाठी जायचे होते. दरम्यान युवराज (Rahul Gandhi) सुद्धा अमृतसरमध्ये असल्यामुळे माझे हेलिकॉप्टर उड्डान काही तासांसाठी रोखण्यात आले होते. विरोधकांना काम करु न देण्याची काँग्रेसला सवय आहे.

Prime Minister Narendra Modi
...म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी राहुल गांधींच्या सभेला मुकले

दरम्यान, पंतप्रधानांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या हेलिकॉप्टरला चंदीगडमधील (Chandigarh) राजेंद्र पार्कवरुन टेकऑफ करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान 'नो फ्लाय झोन' मुळे हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जालंधरमधील रॅलीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला, 'काँग्रेसची सरकारे एका कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलने चालवली जातात.'

Prime Minister Narendra Modi
'अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे आहे पण...' : चरणजीत सिंग चन्नी

ते पुढे म्हणाले, 'आज काँग्रेसची अवस्था बघा. ज्या पक्षात इतकी अंतर्गत भांडणे आहेत, तो पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नाही. रविवारी पंजाब नव्या सरकारसाठी मतदान करणार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com