PM Modis Gifts E-Auction: पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्स खरेदी करण्याचा आज अखेरचा दिवस

1200 गिफ्ट्सची खरेदी एका क्लिकवर शक्य; गतवर्षी 2700 गिफ्ट्सच्या विक्रीतून मिळाले होते 16 कोटी रुपये
PM Modi
PM Modi Dainik Gomantak

PM Modis Gifts E-Auction: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या गिफ्ट्सच्या लिलावाचा आज, बुधवारी अखेरचा दिवस आहे. या गिफ्ट्सचा ऑनलाईन लिलाव सुरू असून त्यासाठी एक वेबसाईटही बनवली गेली आहे. pmmementos.gov.in या वेबसाईटवर सकाळी 11 पासून सायंकाळी 6 पर्यंत या गिफ्ट्ससाठी बोली लावली जाऊ शकते.

PM Modi
Mulayam Singh's Village: मेट्रोसिटीला लाजवेल असे आहे मुलायमसिंह यादव यांचे गाव...

या वर्षभरात पंतप्रधान मोदी यांना देश-विदेशातून जवळपास 1200 गिफ्ट्स आणि स्मृतीचिन्हे मिळाली आहेत. त्या सर्व गिफ्ट्सच्या लिलावासाठी pmmementos.gov.in वर विविध वस्तूंची लिस्टिंग केली गेली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या गिफ्ट्सची बेस प्राईस निश्चित्त केली आहे. विविध वस्तूंसाठी ही किंमत वेगवेगळी आहे. अगदी 100 रूपयांपासून ते 50 लाख रूपयांपर्यंत याच्या किंमती आहेत. लिलावातून जमा होणारी रक्कम 'नमामि गंगे'या योजनेसाठी वापरली जाणार आहे. 2018 मध्येही अशा पद्धतीने जमा झालेला निधी स्वच्छता मिशनसाठी वापरण्यात आला होता.

या वर्षी मोदींना मिळालेल्या गिफ्ट्समध्ये अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि काशी-विश्वनाथ कॉरिडॉर या वास्तुंच्या प्रतिकृती आहेत. याशिवाय बॅडमिंटनपटू श्रीकांत यांची सही असलेले रॅकेट, कुस्ती, हॉकी, लॉन बॉलिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग संघांतील खेळाडुंच्या सह्या असलेल्या जर्सी कलेक्शनचाही यात समावेश आहे.

याशिवाय वेबसाईटवर लिस्टेड गिफ्ट्समध्ये कोरोना महामारी आणि व्हॅक्सिनेशन दाखविणारी मधुबनी पेंटिंग्ज आणि चेन्नईतील चेस (बुद्धिबळ) ऑलिंपियाड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला बुद्धिबळाचा पटदेखील आहे.

PM Modi
Justice D. Y. Chandrachud: वडिलांनंतर आता मुलगाही होणार भारताचा सरन्यायाधीश

यावर्षी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी त्यांना मिळालेल्या उपहारांच्या लिलावाची सुरवात केली होती. सुरवातीला हा लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत होणार होता, पण नंतर त्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर केली गेली.

ई-ऑक्शनद्वारे या वस्तु खरेदी करता येतील. या गिफ्ट्समध्ये पंतप्रधनांना मिळालेल्या विविध पगडी, जॅकेट, पेंटिंग्ज आणि धनुष्य अशा गोष्टी आहेत. याशिवाय धाग्यांपासून बनलेली फ्रेम पेटंगिज, हनुमानाची गदा, सरदार पटेल यांची मॅटेलिक मुर्ती यांचा लिलाव झाला आहे.

2018 पासून लिलावास सुरवात

2014 मध्ये मोदी पंतप्रधान बल्यानंतर त्यांना मिळालेल्या गिफ्ट्सचा पहिला लिलाव 2018 मध्ये झाला होता. या लिलावात 1900 गिफ्ट्सची विक्री झाली होती. 2019 मध्ये 2772, सन 2020 मध्ये लिलाव झाला नव्हता. तर गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये पंतप्रधान मोदींना देशविदेशातून मिळालेल्या 2700 गिफ्ट्सचा लिलाव झाला होता.

नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत

गतवर्षी मोदींना मिळालेल्या गिफ्ट्समध्ये सर्वाधिक किंमत टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या भाल्याला मिळाली होती. या भाल्याला दीड कोटी रूपये मिळाले होते. दरम्यान, गतवर्षी तीन टप्प्यात झालेल्या या लिलावातून १६ कोटीहून अधिक रक्कम जमा झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com