कोरोना काळात जे चीन करू शकला नाही ते भारताने करून दाखवलं: जो बायडेन

क्वाड समिटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केले
US President Joe Biden in bilateral meeting with PM Narendra Modi, in Tokyo, Japan
US President Joe Biden in bilateral meeting with PM Narendra Modi, in Tokyo, JapanDainik Gomantak
Published on
Updated on

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो येथे क्वाड समिटमध्ये सहभागी झाले. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचाही या शिखर परिषदेत समावेश आहे. सध्या पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठक सुरू आहे. यानंतर ते जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची स्वतंत्रपणे भेट घेतील.

दोन्ही देशाच्या फायद्यासाठी भारत-यूएसए गुंतवणूक

या दरम्यान'मला खात्री आहे की आमच्यातील 'भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार' गुंतवणुकीच्या दिशेने मजबूत प्रगती करेल. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमचे द्विपक्षीय सहकार्य वाढवत आहोत आणि जागतिक मुद्द्यांवरही समन्वय साधत आहोत.भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. अनेक क्षेत्रांमध्‍ये आमच्‍या सामायिक हितसंबंधांमुळे विश्‍वासाचे हे नाते घट्ट झाले आहे. आमच्यामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचा सतत विस्तार होत आहे. मात्र, हे आपल्या ताकदीपेक्षा खूपच कमी आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केले.

US President Joe Biden in bilateral meeting with PM Narendra Modi, in Tokyo, Japan
जिनपिंग यांच्या तैवानबाबत लीक झालेल्या योजनेमुळे हादरली अमेरिका, वाचा संपूर्ण प्रकरण

या बैठकीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही आपले मत मांडले. "भारत-अमेरिका मिळून खूप काही करू शकतात. आम्ही दोघे मिळून अमेरिका आणि भारतासाठी खूप काही करू शकतो आणि भविष्यातही देशाच्या विकासासाठी काम करत राहू, यूएस-भारत भागीदारी पृथ्वीवरील सर्वात गहन बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.

बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले

बैठकीपूर्वी बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. मोदींनी कोरोना काळातील परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. तर चीन महामारीचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांना सांगितले, जे चिन करू शकले नाही ते भारताने करून दाखवले, असे म्हणत बायडेन यांनी मोदींचे कौतूक केले.

US President Joe Biden in bilateral meeting with PM Narendra Modi, in Tokyo, Japan
जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; गौतम अदानी, झेलेन्स्की, पुतिन यांचा समावेश

पीएम मोदी आणि जो बायडेन यांची भेट

क्वाड समिटनंतर पंतप्रधान मोदी आणि जो बिडेन यांची भेट झाली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना क्वाड फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले, त्याचबरोबर भारतीय विद्यार्थ्यांना क्वाड फेलोशिपसाठी अर्ज करण्यास प्रेरित केले. "मी आमच्या विद्यार्थ्यांना 'क्वाड' फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास आणि मानवतेसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या STEM नेत्यांच्या आणि नवोदितांच्या पुढच्या पिढीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतो," असे मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com