Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak

परदेशगमनासाठी राहुल गांधींना परवानगीची गरज नाही; काँग्रेसकडून खुलासा

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
Published on

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या लंडन दौऱ्यावर भाजपकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अखेर खुलासा केला. राहुल यांनी परदेशी देणग्या नियमनासंदर्भातील कायद्यांतर्गत (एफसीआरए) परवानगी घेतली होती. लोकप्रतिनिधी या नात्याने राजकीय परवानगी घेण्याची राहुल यांना आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

Rahul Gandhi
'आरोग्याबद्दल विचारपूस करणारा फोन आता येणार नाही': PM नरेंद्र मोदी

महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी अशा निरर्थक मुद्द्यांवर चर्चा घडविली जात आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की मंत्री किंवा सरकारी लाभाचे पद असलेली व्यक्ती, सरकारी अधिकारी, आयोगाचे सदस्य यांसारख्या मंडळींना दौऱ्यासाठी अशा परवानगीची आवश्यकता असते.

Rahul Gandhi
"...शारीरिक संबंध ठेवणे", सुप्रीम कोर्टाच्या पॅनेलची शिफारस

या दौऱ्यातील राहुल यांच्या एका मुलाखतीची आणि त्यातील दीर्घ `पॉजेस''चीही चर्चा सुरू आहे. त्यावरूनही सुरजेवाला यांनी भाजपला सुनावले. ते म्हणाले की, ‘इंदिरा गांधी यांचा नातू, राजीव गांधी यांचा मुलगा म्हणून राहुल यांनी हिंसाचाराशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना घेतलेला वेळ आणि उच्चारलेला क्षमाशीलता हा शब्द यावरून त्यांची खिल्ली उडविली जात असेल तर हा प्रकार कीव करण्यासारखा आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com