रघुवर दास ओडिशाचे नवे राज्यपाल, इंद्रसेन रेड्डी नल्लू यांना त्रिपुराची जबाबदारी!

New Governer List: झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Raghubar Das
Raghubar DasDai nik Gomantak
Published on
Updated on

New Governer List: झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास आणि भाजप नेते इंद्रसेन रेड्डी नल्लू यांची अनुक्रमे ओडिशा आणि त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रघुवर दास यांचा राजकीय प्रवास

रघुवर दास हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक दिग्गज नेते राहिले आहेत. ते झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री बनले होते. दास 1977 मध्ये जनता पक्षाचे सदस्य झाले आणि 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात (Politics) प्रवेश केला.

1995 मध्ये त्यांनी जमशेदपूर पूर्वमधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. यानंतर ते एकाच जागेवरुन पाचपेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. गोविंदाचार्य यांच्या जमशेदपूर पूर्व येथून भाजपच्या तिकिटापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.

Raghubar Das
Supreme Court: ‘सर्वोच्च’ निर्णय! समलिंगी विवाह अमान्‍य; याचिका फेटाळल्या

झारखंडचे मुख्यमंत्री झाले

रघुवर दास 15 नोव्हेंबर 2000 ते 17 मार्च 2003 पर्यंत झारखंडचे (Jharkhand) कामगार मंत्री होते, त्यानंतर मार्च 2003 ते 14 जुलै 2004 पर्यंत बांधकाम मंत्री होते आणि 12 मार्च 2005 ते सप्टेंबर 2005 पर्यंत झारखंडचे वित्त, वाणिज्य आणि शहरी विकास मंत्री होते. यानंतर ते 2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते. सध्या रघुवर दास हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.

Raghubar Das
Supreme Court: समलिंगी विवाहाला कायदेशीर अधिकार मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निर्णय!

तेलंगणातील दिग्गज नेत्यांमध्ये नल्लू यांची गणना होते

इंद्रसेन रेड्डी नल्लू यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. ते तेलंगणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी या नियुक्त्या केल्या असून त्याबद्दल त्या खूश आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com