इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंग, ज्युनिअरचे मुंडन करुन केली मारहाण; पोलिस ॲक्शनमोडमध्ये!

Ragging in Coimbatore College: कोईम्बतूर येथील पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे.
Ragging in Coimbatore College
Ragging in Coimbatore CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

Ragging in Coimbatore College: कोईम्बतूर येथील पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच गोंधळ उडाला. रॅगिंग आणि ज्युनियरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

पीडित विद्यार्थी पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. सिनियर्संनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे, यादरम्यान त्यांनी जबरदस्तीने त्याचे मुंडनही केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला सिनियर्स गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते. त्याला सतत ब्लॅकमेल केले जात होते. विद्यार्थ्याने दारुचे पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप सिनियर्संनी केला आहे.

सोमवारी त्यांनी त्याला एका खोलीत नेले, तिथे त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सिनियर्संनी पीडित विद्यार्थ्याला (Student) बेल्टने मारले. एवढ्यावरच न थांबता सिनियर्संनी ही घटना त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे.

Ragging in Coimbatore College
Tamil Nadu: तमिळनाडूत प्रमोद सावंतांकडून स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा समाचार; ‘सनातन’चा उदो उदो

दरम्यान, पीडित विद्यार्थी जेव्हा वसतिगृहातील त्याच्या खोलीत गेला तेव्हा याबाबत पालकांना सांगितले. यानंतर त्यांनी कोईम्बतूर गाठून महाविद्यालय प्रशासनाकडे घटनेची तक्रार केली. त्यांनी सात आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध E2 पीलामेडू पोलिस (Police) ठाण्यात तक्रारही दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मंगळवार 7 नोव्हेंबरच्या रात्री आरोपीला अटक केली.

Ragging in Coimbatore College
Tamil Nadu Accident: तामिळनाडूत भीषण अपघात, बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

दुसरीकडे, आरोपी विद्यार्थ्यांवर कलम 323, 324, 342,143, 355 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमिळनाडू रॅगिंग प्रतिबंध कायदा 1997 च्या कलम 506 (i) (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि कलम 4 अंतर्गत विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या दंडाचा समावेश आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने याप्रकरणी कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com