Tamil Nadu: तमिळनाडूत प्रमोद सावंतांकडून स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा समाचार; ‘सनातन’चा उदो उदो

आमच्या विचारसरणीच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आम्ही विरोध करू!
Goa CM Dr Pramod Sawant In Tamil Nadu
Goa CM Dr Pramod Sawant In Tamil NaduDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Dr Pramod Sawant In Tamil Nadu: सनातन हिंदू धर्म संपवण्यास निघालेल्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांच्या तमिळनाडू राज्यात जाऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन हिंदू धर्माचा आज जोरदार पुरस्कार केला.

थेवर समाजाचे गुरू, खासदार, स्वातंत्र्यसैनिक पसुम्पटन मुथूरामलिंग थेवर यांच्या जयंती, पुण्यतिथी सोहळ्यात आज मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे होते. त्यांनी सनातन हिंदू धर्माची महती आपल्या भाषणात तेथे व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले, की या कार्यक्रमाचे आयोजन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले होते. पाच लाखांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्या नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवरून एखादा नेता पाठवावा अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली होती.

पक्षाने मला तेथे जाण्याची संधी दिली. स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा मी मध्यप्रदेशात समाचार घेतला. आमच्या विचारसरणीच्या विरोधात बोलणाऱ्यांचा विरोध आम्ही करतच राहू.

स्टॅलीन यांच्या राज्यात जाऊन तेथे मला माझे विचार मांडता आले तेही लाखो लोकांच्या समक्ष ही बाब माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे.

Goa CM Dr Pramod Sawant In Tamil Nadu
National Games 2023: ॲथलेटिक्स, जलतरणात नवे विक्रम; बीच फुटबॉलमध्ये गोव्‍याकडून उत्तराखंडचा फडशा

मुथूरामलिंग यांनी ब्रिटिश काळात सरसकटपणे दलितांना गुन्हेगार ठरवणारा कायदा रद्द करवून घेतला. त्यांनी मदुराईतील मंदिरे दलितांसाठी खुली करवून घेतली. ते कॉंग्रेसमध्ये होते, पण बहुमत असतानाही सुभाषचंद्र बोस यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यामुळे मुथूरामलिंग यांनी काँग्रेस सोडली व त्यावेळी सुभाषचंद्र यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉकचे ते उपाध्यक्ष झाले. त्यांनी आमदार आणि खासदारकीची निवडणूक एकाचवेळी लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या, दुसऱ्या वेळीही तसेच केले आणि दोन्ही विजय मिळवले.

दोन्ही वेळेला त्यांनी खासदारपद कायम ठेवले. तिसऱ्यांदा ते खासदार झाले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. थेवर समाज त्यांना फार मानतो, त्यांना गुरूचे स्थान आहे.

अलोट गर्दी आज होती. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थित राहता आले याचे अप्रूप वाटते.

मुथूरामलिंग यांना आदरांजली

तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी मदुराई येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तेथून मुख्यमंत्री देयवतीरुमग्नार येथे या सोहळ्यासाठी गेले. तेथे त्यांनी मुथूरामलिंग यांच्या पूर्णाकृती सुवर्ण पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि मंदिरातील त्यांच्या पुतळ्यासमोर आदरांजली अर्पण केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सनातन हिंदू धर्माचे महत्त्व आणि भाजपची भूमिका यावर भाष्य केले. धर्माचा विकास आणि प्रसार यावरील ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com