QS Asia Ranking 2024: आशियातील टॉप-100 इंस्टीट्यूशन रॅकिंगमध्ये भारताने चीनला टाकले मागे, IIT बॉम्बे पुन्हा 'सर्वोत्तम'

QS एशिया रँकिंग 2024 मध्ये विक्रमी 148 विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे, तर चीनमधील केवळ 133 विद्यापीठे या यादीत समाविष्ट होऊ शकली आहेत.
IIT Bombay
IIT Bombay Dainik Gomantak
Published on
Updated on

QS Asia Ranking 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला बुधवारी जाहीर झालेल्या QS एशिया रँकिंग 2024 मध्ये सलग दुसऱ्यांदा देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून मानांकन देण्यात आले आहे. एवढेच नाही तर रँकिंग विद्यापीठांच्या संख्येत भारताने चीनला मागे टाकले आहे. QS एशिया रँकिंग 2024 मध्ये भारताच्या विक्रमी 148 विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे, तर चीनमधील केवळ 133 विद्यापीठे या यादीत समाविष्ट होऊ शकली आहेत.

QS विश्लेषकांनी जारी केलेल्या वक्तव्यानुसार, भारत आता QS एशिया रँकिंगमध्ये 148 प्रतिष्ठित विद्यापीठांसह सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी उच्च शिक्षण प्रणाली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 37 ने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ चीन 133 आणि जपानची 96 विद्यापीठे आहेत. याशिवाय कंबोडिया, म्यानमार आणि नेपाळ प्रथमच सामील झाले आहेत.

IIT Bombay
Asia University Rankings 2023: आशियातील टॉप 200 विद्यापीठांची यादी जाहीर, जाणून घ्या भारतीय विद्यापीठांची रॅंकिंग

आशियातील टॉप 100 मध्ये 5 IIT

क्यूएसनुसार, आयआयटी बॉम्बे व्यतिरिक्त, कानपूर, मद्रास, दिल्ली, खरगपूर, आयआयएससी बंगलोर आणि दिल्ली विद्यापीठ देखील देशातील टॉप 100 संस्थांमध्ये सामील झाले आहेत. क्यूएसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन साउटर म्हणाले की, भारताने पीएचडी इंडिकेटरसह स्टाफसाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम सरासरी स्कोर मिळवला आहे, जो गेल्या वर्षीच्या 22 च्या तुलनेत 42.3 होता. हा स्कोर सशक्त संशोधन आउटपुट आणि उच्च पात्र फॅकल्टी बॉडी दर्शवतो. ही कामगिरी भारतीय संस्थांना त्यांची जागतिक प्रतिष्ठा आणखी वाढवण्यासाठी त्यांच्या संशोधन क्षमतेचा लाभ घेण्याची क्षमता दर्शवते, असे निवेदनात म्हटले आहे.

IIT Bombay
BBC Documentary: पीएम मोदी अन् गुजरात दंगलीवरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन JNU मध्ये कल्ला, वीजपुरवठा खंडित!

QS अहवालानुसार, भारताची आउटबाउंड विद्यार्थ्यांची गतिशीलता हा एक मैलाचा दगड आहे. अहवालानुसार, आयआयटी बॉम्बेने 40 वे स्थान पटकावले आहे. यानंतर आयआयटी दिल्ली 46व्या तर आयआयटी मद्रास 53व्या स्थानावर आहे. क्रमवारीत आणखी 30 महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. QS रँकिंग 2023 मध्ये देशातील 118 विद्यापीठांचा समावेश होता, तर 2024 मध्ये 148 विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. एकूणच, चीनमधील पेकिंग विद्यापीठाने आशिया खंडात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर हाँगकाँग विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि सिंघुआ युनिव्हर्सिटी यांचा क्रमांक लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com