Asia University Rankings 2023: आशियातील टॉप 200 विद्यापीठांची यादी जाहीर, जाणून घ्या भारतीय विद्यापीठांची रॅंकिंग

Top 18 Indian Universities: आज आम्ही तुम्हाला एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 बद्दल सांगणार आहोत. त्यात 200 संस्थांचा समावेश आहे.
Asia University Rankings 2023
Asia University Rankings 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Asia University Rankings 2023: जेव्हा आपण आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा किंवा स्वतःच्या उच्च शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्याला सर्वोत्तम संस्थेतून शिक्षण घ्यायचे असते. यासाठी देशात आणि जगात कोणती विद्यापीठे आणि महाविद्यालये सर्वोत्तम आहेत, यासंबंधी आपण सर्च करतो.

आज आम्ही तुम्हाला एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 बद्दल सांगणार आहोत. त्यात 200 संस्थांचा समावेश आहे. या यादीत भारतातील 18 विद्यापीठे भारतातील आहेत. एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये टॉप 50 मध्ये एक भारतीय युनिव्हर्सिटी, टॉप 100 मध्ये चार आणि टॉप 200 मध्ये 18 युनिव्हर्सिटीचा (University) समावेश आहे.

1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बंगळुरु (IISc): 48

2. जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च: 68

3. शूलिनी जैवतंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विज्ञान विद्यापीठ: 77

4. महात्मा गांधी विद्यापीठ: 95

5. आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद: 106

Asia University Rankings 2023
PM Modi in USA: चर्चा, मोदींनी जिल बायडेन यांना दिलेल्या हिऱ्याची होतेय; पण, सुंदर पिचाई यांनी भारताला दिलेले 'GIFT' गेमचेंजर ठरणार

6. अलगप्पा विद्यापीठ: 111

7. सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस: 113

8. जामिया मिलिया इस्लामिया: 128

9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर: 131

10. इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली: 137

11. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर: 142

12. थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी: 145

13. KIIT विद्यापीठ: = 147

14. बनारस हिंदू विद्यापीठ: = 155

15. ग्राफिक युग विद्यापीठ: =159

16. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ: =170

17. कलासलिंगम अॅकॅडमिक ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन: =183

18. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: 190

Asia University Rankings 2023
PM Modi In USA: PM मोदींचे ग्रँड वेलकम, न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर FIA ने फडकवला 250 फूट लांब बॅनर, पाहा Video

तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) बंगळुरु 48 व्या क्रमांकासह भारतातील (India) सर्व संस्थांमध्ये अव्वल आहे, तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा स्थानांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) या यादीतून बाहेर पडले आहे. गेल्या वर्षी जेएनयू 167 व्या क्रमांकावर होते, परंतु यावेळी 201-250 संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com