गँगस्टर बिश्नोईला आणण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीला रवाना; उच्च न्यायालयात आज सुनावणी

पंजाब पोलिसांनी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला चौकशीसाठी राज्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गँगस्टर बिश्नोईला आणण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीला रवाना; उच्च न्यायालयात आज सुनावणी
Published on
Updated on

पंजाब पोलिसांनी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Gangster Lawrence Bishnoi) चौकशीसाठी राज्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बिश्नोईला प्रोडक्शन वॉरंटवर आणण्यासाठी पंजाब पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयातून (Delhi High Court) याचिका मागे घेतल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. बिश्नोई यांचे वकील संग्राम सिंह सरोन आणि शुभ्रीत कौर यांनी ही याचिका दाखल केली गेली आहे. (Punjab police sent to Delhi to nab Gangster Lawrence Bishnoi Hearing in the High Court today)

गँगस्टर बिश्नोईला आणण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीला रवाना; उच्च न्यायालयात आज सुनावणी
कच्चे तेल 10 डॉलरने स्वस्त, पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी? जाणुन घ्या आजचे दर

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येच्या तपासासाठी लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधील मानसा येथे आणले जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, असे देखील याचिकेत म्हटले आहे. बिश्नोई यांनी म्हटले की, यात त्यांच्या जीवाला गंभीर धोका दिसून येते आहे. 29 मे रोजी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बिश्नोईचे नाव तपासातील त्रुटी लपवण्यासाठी नोंदवण्यात आल्याचे सरोन पुढे म्हणाले. त्याला बळीचा बकरा बनवला जात असून त्याला चुकीच्या पद्धतीने जबाबदार धरण्यात येत असल्याचे यावेळी वकिलाने म्हटले आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वीच पंजाब पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्याला या हत्येसाठी जबाबदार धरले.

बिश्नोईच्या वकिलाने सांगितले की हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे कारण तो पंजाबी गायकाच्या हत्येशी संबंधितच आहे. मुसेवाला यांच्या हत्येनंतर बिश्नोई यांनी सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु आवश्यक संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली गेली.

लॉरेन्स बिश्नोईची मानसामध्ये होणार चौकशी !

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मानसाचे एसएसपी गौरव तुरा म्हणाले की, "सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला राज्यात आणल्यानंतर आम्ही त्याची कसून चौकशी करू." सध्या बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. कायद्यानुसार या प्रकरणाच्या तपासात आम्ही त्याला सहभागी करून घेणार आहोत. सुगावा मिळाल्याने पोलीस गायकाच्या हत्येचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

गँगस्टर बिश्नोईला आणण्यासाठी पंजाब पोलीस दिल्लीला रवाना; उच्च न्यायालयात आज सुनावणी
भारतीय तटरक्षक दलाची गुजरातमध्ये मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीसह 7 जणांना अटक

पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोर कोठून आले आणि घटना घडवून आणल्यानंतर ते कसे फरार झाले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस सध्या करत आहेत. एसएसपी म्हणाले की, पोलिस लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची कॅनडास्थित सहकारी गोल्डी ब्रार यांच्या भूमिकेची चौकशी सुरु आहे. गोल्डीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सिंगरच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com