भारतीय तटरक्षक दलाची गुजरातमध्ये मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीसह 7 जणांना अटक

हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहे, जेथे गुजरात एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली
7 Pakistani Arrested In Gujarat
7 Pakistani Arrested In GujaratANI
Published on
Updated on

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) मोठी कारवाई करत गुजरातमध्ये पाकिस्तानी बोट पकडली आहे. पाकिस्तानी बोटीसोबतच 7 क्रू मेंबर्सला देखील पकडण्यात आले. हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहे, जेथे गुजरात एटीएसच्या (ATS) गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे. बोट ताब्यात घेतल्यानंतर ती काल रात्री ओखा (Okha) येथे आणण्यात आली आहे. आज येणाऱ्या विविध एजन्सी बोटीची पाहणी करणार असून क्रू मेंबर्सकडे या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. (7 Pakistani Arrested In Gujarat)

7 Pakistani Arrested In Gujarat
काश्मीरमधील हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली, टार्गेट किलिंगनंतर मोठा निर्णय

बोटीमध्ये दारू आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आणि पुढील तपासासाठी बोट ओखा (देवभूमी द्वारका येथील) येथे हलविण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण पीआरओ गुजरात यांनी ट्विट करून दिली आहे.

'अल नोमान' ही पाकिस्तानी बोट सात क्रू सदस्यांसह ICG जहाज 'अरिंजय' ने 30 आणि 31 मे च्या मध्यरात्री गुजरात एटीएसने सांगितलेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे पकडली होती. ही बोटअवैध मालाची खेप घेऊन जात होती. समुद्रातील बोटीच्या प्राथमिक तपासणीत कोणतीही तस्करी आढळून आली नाही, परंतु 2 जून रोजी ओखा येथे आल्यावर पुढील शोध घेतला जाईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

7 Pakistani Arrested In Gujarat
काश्मीरच्या शोपियानमध्ये IED स्फोट, तीन जवान जखमी

ऑपरेशनशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ICG जहाजाने भारतीय समुद्रात विचित्रपणे फिरणाऱ्या बोटीला पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ थांबण्याची विनंती केली तेव्हा बोटीने टाळाटाळ करण्यास सुरवात केला.अतिशय खडबडीत समुद्र आणि आव्हानात्मक हवामान असतानाही ICG जहाज अरिंजयने युक्ती करून ही बोट थांबवली. जवळून तपासणी केली असता ती पाकिस्तानी बोट असल्याचे समोर आले, आणि आम्ही तपासाला सुरवात केली, अशी माहिती गुजरातच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com