कच्चे तेल 10 डॉलरने स्वस्त, पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी? जाणुन घ्या आजचे दर

जागतिक बाजारपेठेत प्रति बॅरल 124 डॉलरवर पोहोचल्यानंतर गुरुवारी कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 114 डॉलरच्या जवळ आली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दरही जारी करण्यात आले आहेत.
Today Petrol Diesel Price
Today Petrol Diesel PriceDainik Gomantak

नवी दिल्ली: जागतिक बाजारात दोन महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर आज कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 10 डॉलरने स्वस्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आजही त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

(Crude oil cheaper by 10, petrol and diesel prices lower? Find out today's rates)

Today Petrol Diesel Price
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, निफ्टी 16500 च्या आसापास

जागतिक बाजारपेठेत रशियन तेलावरील निर्बंधांमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला, त्यामुळे बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 124 डॉलरवर पोहोचली. नंतर, ओपेकने जागतिक अर्थव्यवस्थेत पुरवठा वाढवणे आणि तेलाचा वापर कमी केल्याच्या बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीला ब्रेक लागला. आज सकाळी ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $114 च्या जवळ घसरला. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर कायम आहेत.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्येही नवीन भाव सुरू आहेत

  • नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

Today Petrol Diesel Price
ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, PFI अन् रिहॅब इंडिया फाउंडेशनची गोठवली 33 बँक खाती

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com