PM Modi: मोठी बातमी! PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी 8 IPS अन् 1 IAS अधिकाऱ्यावर होणार कारवाई

PM Modi Security Breach: 5 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा भटिंडा विमानतळावरुन हुसैनीवालाला जात असताना त्यांचा ताफा अर्धा तास उड्डाणपुलावर अडकून पडला होता.
PM Modi Security Breach:
PM Modi Security Breach:Dainik Gomantak

PM Narendra Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी पंजाब सरकार एक्शनमध्ये आले आहे.

मुख्य सचिव व्ही के जंजुआ (Vijay Kumar Janjua) यांनी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना 9 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फाइल पाठवली आहे.

5 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा भटिंडा विमानतळावरुन हुसैनीवालाला जात असताना त्यांचा ताफा अर्धा तास उड्डाणपुलावर अडकून पडला होता.

1 IAS आणि 8 IPS वर कारवाई होणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी पंजाब (Punjab) सरकार एका IAS अधिकारी आणि 8 IPS अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

तत्कालीन मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांच्याशिवाय डीआयजी सिद्धार्थ चटोपाध्याय, एसएसपी हरमनदीप सिंह हंस, एसएसपी चरणजीत सिंह, एडीजीपी नागेश्वर राव, एडीजी नरेश अरोरा, आयजी राकेश अग्रवाल, आयजी इंदरवीर सिंग आणि डीआयजी सुरजित सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

PM Modi Security Breach:
BrahMos Missile: भारतीय लष्कराची ताकद वाढणार, नौदलात दाखल होणार 200 ब्रह्मोस मिसाईल

केंद्र सरकारने पत्र लिहून कारवाईचा अहवाल मागवला होता

नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) पंजाब सरकारला पत्र लिहून पीएम मोदी सुरक्षा उल्लंघन प्रकरणी कारवाईचा अहवाल मागवला होता.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजय कुमार जंजुआ यांना पत्र लिहून दोषी अधिकार्‍यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल मागवला होता.

पत्रात कारवाईला झालेल्या दिरंगाईचा संदर्भ देत, कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते, त्यानंतर आता पंजाब सरकार एक्शनमध्ये आले आहे.

PM Modi Security Breach:
Punjab Ajnala Violence: अमृतपाल सिंगच्या बहाण्याने पंजाबमध्ये रचलं जातयं षडयंत्र, कोण आहे त्यामागे?

फिरोजपूर दौऱ्यात सुरक्षेत कुचराई झाली होती

गेल्या वर्षी 5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला (PM Narendra Modi Punjab Visit) येथे जात होते.

यादरम्यान पावसामुळे पीएम मोदींना रस्त्याने जावे लागले, मात्र यादरम्यान आंदोलकांनी हुसैनीवालापासून सुमारे 30 किमीचा रस्ता अडवला आणि त्यामुळे पीएम मोदींचा ताफा अर्धा तास उड्डाणपुलावर अडकून पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com