Brahmos Supersonic Cruise Missile: भारताची समुद्रात ताकद वाढणार आहे. कारण लवकरच भारतीय नौदलात 200 ब्रह्मोस सूपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र दाखल होणार आहे. केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर अधिक भर देत आहे.
वरिष्ठ संरक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
200 ब्रह्मोस मिसाईल नौदलात दाखल होणार
भारतीय नौदलात (Indian Navy) लवकरच 200 म्रह्मोस हे क्षेपणास्त्र सहभागी होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हा मोठा करार पूर्ण होईल. हा करार सुमारे 20 हजार कोटीचा असेल. हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडून परवानगीच्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
भारताचे लष्करी सामर्थ्यात होणार वाढ
ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौका, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरुन डागता येणार आहे. ही क्रूझ क्षेपणास्त्र युद्धनौकांवर तैनात केली जातील. भारत आणि रशिया (Russia) यांच्या संयुक्त उपक्रमातून या स्वदेशी क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. इंडो-रशियन मोहिमेअंतर्गत भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरुन या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आले आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग ताशी 4321 किमी आहे.
यामध्ये सॉलिड आणि लिक्विड टू स्टेज प्रोपल्शन सिस्टीम आहे.
रॅमजेट इंजिनमुळे या क्षेपणास्त्राला सुपरसॉनिक गती मिळते आणि इंधनाचा वापर कमी होतो.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र हवेतच मार्ग बदलु शकतो.
हे क्षेपणास्त्र हलणाऱ्या लक्ष्यावर म्हणजे दिशा बदलणाऱ्या लक्ष्यावरही हल्ला करुन नष्ट करु सकते
हे क्षेपणास्त्र 10 मीटर उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम आहे.
हे शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही. कारण यामध्ये कोणत्याही क्षेपणास्त्र शोध प्रणालीला फसवण्याची क्षमता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.