Punjab Ajnala Violence: अमृतपाल सिंगच्या बहाण्याने पंजाबमध्ये रचलं जातयं षडयंत्र, कोण आहे त्यामागे?

Punjab Ajnala Violence: एवढेच नाही तर आणखी अनेक टेलिग्राम चॅनेल तयार करुन खलिस्तानशी संबंधित भडकाऊ व्हिडिओ शेअर करण्यात आले.
Amritpal Singh
Amritpal SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Ajnala Violence: पंजाबमधील अजनाळा येथील हिंसाचार हा काही मोठ्या कटाचा भाग होता का? पंजाबमधील हिंसाचाराची स्क्रिप्ट महिनाभर आधी लिहिली होती का?

मिळालेल्या विशेष माहितीनुसार, गेल्या 25 डिसेंबरला खलिस्तानवाद्यांनी टेलिग्रामवर एक टेलिग्राम चॅनल तयार केला होता, ज्यामध्ये जगभरातून 20 हजारांहून अधिक खलिस्तानी समर्थक जोडले गेले होते.

एवढेच नाही तर आणखी अनेक टेलिग्राम चॅनेल तयार करुन खलिस्तानशी संबंधित भडकाऊ व्हिडिओ शेअर करण्यात आले.

सोशल मीडियाचा वापर

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये बसलेल्या खलिस्तानींच्या मदतीने पंजाबमध्ये (Punjab) कट रचण्यात आला होता. पाकिस्तानात बसलेले खलिस्तानी तत्व टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून खलिस्तानी अजेंड्याला हवा देत आहेत.

Amritpal Singh
Waris Punjab De: पंजाबमध्ये अमृतपाल समर्थकांचा राडा! साथीदाराच्या सुटकेसाठी पोलिस ठाण्याला घेराव

खलिस्तानी प्रचाराला हवा

तज्ज्ञांच्या मते, अमृतपाल सिंगच्या बहाण्याने खलिस्तानी प्रचाराला हवा दिली जात आहे. अमृतपाल याच्या भाषणाचे आणि त्याच्या समर्थनाचे व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) टूलकिट वापरुन शेअर केले जात आहेत.

संपूर्ण जगात खलिस्तानी अजेंड्याला हवा देण्यासाठी, पाक-समर्थित खलिस्तानींनी जगभरातील मोठ्या संख्येने फॉलोअर्ससह व्हेरिफाईड अकाउंट्सद्वारे व्हिडिओ शेअर केले आहेत.

पाकिस्तान हे खलिस्तान समर्थक पोस्टचे ठिकाण होते

खलिस्तानी षडयंत्र आणि पंजाब सार्वमताच्या संदर्भात, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात बनावट हँडल सोशल मीडियावर भारताविरोधात लेख पोस्ट करत असल्याची माहिती मिळाली आहे.

29 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर खलिस्तानच्या नावाने 8,332 पोस्ट करण्यात आल्या होत्या, त्यापैकी बहुतांश पोस्टची ठिकाणे पाकिस्तानमध्ये आढळून आली होती. त्याचप्रमाणे 15 डिसेंबर रोजी खलिस्तानच्या नावावर एकूण 8707 पोस्ट होत्या, त्यापैकी बहुतांश पोस्टचे ठिकाण पाकिस्तान आणि अमेरिका होते.

Amritpal Singh
Punjab: भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय, 14417 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या 'कन्फर्म'

ज्या हँडलवरुन खलिस्तानच्या नावाने पोस्ट टाकण्यात आल्या, त्यात काश्मीरबाबत भारताविरोधात चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या.

तसेच, पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिकेत बसलेल्या फुटीरतावादी गटांकडून भारताविरुद्ध खलिस्तानी कारस्थान रचले जात आहे. भारतातील खलिस्तानी कट फसल्याने खलिस्तानी गट नाराज असून, त्यांचा कट यशस्वी करण्यासाठी ते पाकिस्तानी लोकांची मदत घेत आहेत, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com