केजरीवाल दिल्लीतील महिलांना का देत नाहीत 1000 रुपयांची मदत?

पंजाबने आपली बिले गहाण ठेवून 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारले, पंजाब आर्थिक दिवाळखोरीवर उभा
Punjab Congress president Navjot Singh Sidhu and Arvind kejriwal
Punjab Congress president Navjot Singh Sidhu and Arvind kejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

एकीकडे काँग्रेसचे (Congress) सर्व बडे नेते जयपूरमधील महारॅलीमध्ये व्यस्त आहेत, तर दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना पंजाबमध्ये टार्गेट करण्यात व्यस्त आहेत.

"खोटे बोलून सत्ता मिळवायची असेल तर मी तुमच्यासोबत नाही, मी फक्त ग्राउंड रिअ‍ॅलिटीची बाजू घेईन. मी खोट्या आश्वासनांच्या बाजूने नाही. पंजाब कर्जबाजारी आहे, लोकांना त्याची माहिती नाही. दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकारण्यांनी दीड लाख कोटींच्या जमिनी हडप केल्या आहेत," असे सिद्धू म्हणाले.

Punjab Congress president Navjot Singh Sidhu and Arvind kejriwal
काँग्रेसच्या बहिण-भावाकडे पक्ष वाचवण्याचे आव्हान: संजय राऊत

केबल टीव्हीच्या किमती आणि कथित कर चुकवेगिरीवरून त्यांनी बादल कुटुंब आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले,"मी स्वतः दारू पीत नाही आणि दारू विक्रीतून महसूल मिळवण्याच्या बाजूनेही नाही. पण सरकार कमावत असेल तर हा तोटा थांबवायला हवा. पंजाबला केवळ दारूवरील उत्पादन शुल्कातून 3500 कोटी रुपये मिळतात. माफिया महसूल बुडवत आहेत. पंजाबने आपली बिले गहाण ठेवून 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारले आहे. पंजाब आर्थिक दिवाळखोरीवर उभा आहे.

Punjab Congress president Navjot Singh Sidhu and Arvind kejriwal
मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही; राहुल गांधी

याशिवाय विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election 2022) पार्श्वभमिवर 26 लाख नोकऱ्यांची घोषणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सिद्धू यांनी निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवत सिद्धू म्हणाले की, त्यांनी दिल्लीतील महिलांना 1000 रुपये का दिले नाहीत? इतर राज्यात जावून महिलांना आर्थिक मदत देण्याच्या घोषणा केल्या. दिल्लीत 19 हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पंजाबवर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. हा पैसा दोन मुख्यमंत्र्यांसह 100 लोकांकडे गेला.

दरम्यान मोफत वीज, मोफत पाणी, मोफत तीर्थाटन या आश्वासनानंतर आज आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मागील आठवड्यात गोव्यात महिलांना गृह आधार योजनेखाली अडीच हजार रूपये देण्याची गॅरंटी देतानाच या योजनेचा ज्या महिलांना फायदा मिळत नाही त्या राज्यातील 18 वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये आम आदमीचे सरकार गोव्यात आल्यास जमा केले जाईल असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com