'कुटुंबाला कामापासून दूर ठेवा', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्र्यांना बजावले

पंजाबचे आरोग्य मंत्रालय मुख्यमंत्री मान यांच्याकडेच राहणार आहे.
Punjab CM Bhagwant Mann
Punjab CM Bhagwant MannTwitter/CM Bhagwant Mann
Published on
Updated on

आरोग्य मंत्री विजय सिंगला यांची हकालपट्टी केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अत्यंत कडक भूमिका स्वीकारली आहे. भगवंत मान यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना नातेवाईकांना आपल्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका, असा इशारा दिला आहे. एखाद्या मंत्र्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कामात ढवळाढवळ केली, तर ही गोष्ट आपण अजिबात खपवून घेणार नाही, असे भगवंत मान यांनी स्पष्ट केले आहे. (Punjab CM Bhagwant Mann)

एका वृत्तानुसार भगवंत मान यांनी आपल्या सर्व मंत्र्यांचा अभिप्राय घेतला आहे. दरम्यान, भगवंत मान यांना काही मंत्र्यांच्या पत्नी, मुलगे आणि इतर कुटुंबीय कामात ढवळाढवळ करत असल्याची माहिती मिळाली आहे. भगवंत मान यांनी आपल्या मंत्र्यांना असे प्रकार टाळण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

Punjab CM Bhagwant Mann
कपिल सिब्बलांनी कॉंग्रेस सोडताच पूर्व कॉंग्रेस नेत्याने साधला निशाणा

कोणत्याही मंत्र्याच्या कुटुंबातील सदस्य शासकीय बैठकीत आढळल्यास त्यांना खुर्ची गमवावी लागू शकते, असे भगवंत मान यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराचे आरोपाखाली आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना हटवले होते. विजय सिंगला यांचे कुटुंबीय ठेकेदारांकडून एक टक्का कमिशनची मागणी करत होते, या प्रकरणाचा तपास होताच मान यांनी आरोग्यमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी केली.

आरोग्य मंत्रालय मान यांच्याकडेच राहील

विजय सिंगला यांची हकालपट्टी केल्यानंतर पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अटकळ होती. मात्र आता ती अटकळ दूर होऊन भगवंत मान यांनी या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. आता आरोग्य मंत्रालय स्वतःकडे ठेवणार असल्याचं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

Punjab CM Bhagwant Mann
समाजवादी पार्टी जयंत चौधरींना राज्यसभेवर पाठवणार

भगवंत मान यांच्या पंजाब सरकारसाठी आरोग्य मंत्रालय अत्यंत महत्त्वाचे आहे. याद्वारे आम आदमी पक्षाला दिल्लीचे मॉडेल पंजाबमध्ये राबवायचे आहे. भगवंत मान 15 ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये 75 नवीन मोहल्ला क्लिनिक उघडण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com