समाजवादी पार्टी जयंत चौधरींना राज्यसभेवर पाठवणार

समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांना राज्यसभेचे तिसरे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
Samajwadi Party
Samajwadi PartyDainik Gomantak
Published on
Updated on

समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना राज्यसभेचे तिसरे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. एका ट्विटमध्ये समाजवादी पक्षाने म्हटले आहे की जयंत चौधरी हे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाकडून राज्यसभेचे संयुक्त उमेदवार देखील असतील. (The Samajwadi Party has declared Jayant Chaudhary as the third Rajya Sabha candidate)

याआधी कपिल सिब्बल आणि जावेद अली खान यांनी बुधवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. 59 वर्षीय खान, जे 2014 ते 2020 पर्यंत एसपीचे राज्यसभा सदस्य राहिले आहेत, त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते राम गोपाल यादव, अंबिका चौधरी आणि इतरांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली होती. दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी अपक्ष उमेदवार म्हणून सपाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

403 सदस्यीय यूपी विधानसभेत भाजपचे एकूण 273 आमदार आहेत, ज्यात 255 आणि त्याच्या मित्रपक्षांचा देखील समावेश आहे आणि 11 पैकी 8 राज्यसभेच्या जागांवर आपले उमेदवार सहज जिंकूण येऊ शकतात. दुसरीकडे, सपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सदस्यांची एकूण संख्या 125 आहे आणि ते तीन उमेदवार जिंकू शकतात असेही वर्तवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com