केजरीवालांची मोठी घोषणा! दिल्लीत होणार देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल

मी दिल्लीच्या लोकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा करणार आहे-अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi Shopping Festival: आज दुपारी 12 वाजता दिल्लीतील जनतेसाठी मोठी घोषणा करणार आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले होते. आणि त्यांना आज खरच दिल्लीतील लोकांना मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल दिल्लीत आयोजित केला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. राजधानी दिल्लीत देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 30 दिवसांपासून त्याचे नियोजन सुरू होते आणि आता त्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे.

जगातील सर्वात मोठा फेस्टिवल

आगामी काळात हा जगातील सर्वात मोठा सण असेल, दिल्लीतील लोकांना आणि तिथली संस्कृती समजून घेण्यासाठी जगभरातील लोकांना या महोत्सवासाठी आमंत्रित केले जाईल. यासोबतच या महोत्सवात लहान मुले, वृद्ध, महिलांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी खूप काही असेल, असेही केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal
UNMISS चे नवीन फोर्स कमांडर म्हणून भारताचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची नियुक्ती
Arvind Kejriwal
हवाई दलात पहिल्यांदाच बाप-लेकीने विमानाच्या एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण करून रचला इतिहास

28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी (2023 मध्ये) 30 दिवसांचा दिल्ली शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केला जाईल. हा भारतातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल असेल. आम्ही त्याचे नियोजन करत आहोत. मला आशा आहे की काही वर्षांत आम्ही हा जगातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल बनवू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Kamareddy ATM Robbery
Greater Noida Delivery Riders Fight
Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com