नवी दिल्ली : सध्या देशाच्या राजकारणात काँग्रेसची पिच्छेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी काँग्रेसच्याच गोठात होत आहे. त्यातच आता हे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी समोर आली आहे. तसा प्रस्ताव दिल्लीत मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः उपस्थित होते. (Proposal of Sharad Pawar to make president of UPA)
दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत हा प्रस्ताव मांडला गेला असला तरीही यापुर्वीही पवार (Sharad Pawar) यांच्यांकडे यूपीएच्या अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी झाली होती. तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे. तसेच यूपीएच्या अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणीला आता जोर धरत आहे. यामुळे पवार युपीएचे अध्यक्ष होणार का? अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. तर या बैठकीला देशभरातील सुमारे 100 नेते उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे म्हणाले की, "आम्ही एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, तेथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) प्रमुखांनी त्याला साफ नकार दिला.
दरम्यान प्रदेश युथ विंगचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी, या प्रस्तावाला पाठिंबा देत प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याची क्षमता असलेल्या शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असे म्हटले. त्याचवेळी वर्पे म्हणाले की, सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ पकड आहे. त्यामुळे शरद पवार यांना अध्यक्ष केल्याने त्याचा फायदा होईल. मात्र, या ठरावात सोनिया गांधींचा राजीनामा मागितलेला नाही. सोनिया गांधी सध्या यूपीएच्या (UPA) अध्यक्षा आहेत. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केलेल्या प्रस्तावावर काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतील हे पाहावं लागले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.