शिमल्यात तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदरासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांवर एफआयआर

काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंग यांच्यासह इतर नेत्यांवर कलम-144 तोडण्याचा आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे
Tiranga Yatra News, Tiranga Yatra In Shimla News
Tiranga Yatra News, Tiranga Yatra In Shimla NewsTwitter
Published on
Updated on

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला (Shimla) येथे मंगळवारी रिज मैदानावर तिरंगा यात्रा काढल्याबद्दल पोलिसांनी काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंग ( Congres MLA Vikramaditya Singh) आणि युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यदोपती ठाकूर यांच्यासह 9 काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शिमला येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या नेत्यांवर कलम-144 तोडण्याचा आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे आणि सर्वांवर कलम 40/2022 अन्वये 143,188 IPC अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (FIR for holding Tiranga Yatra In Shimla)

हे संपूर्ण प्रकरण खलिस्तानी दहशतवादी संघटना SJF च्या धमकीशी संबंधित आहे. विक्रमादित्य सिंग यांना संघटनेचा नेता पुन्नू याने 29 मार्च रोजी शिमल्यात खलिस्तानचा झेंडा फडकावण्याची धमकी दिली होती. प्रत्युत्तर म्हणून विक्रमादित्य सिंह यांनी मंगळवारी शिमल्यातील रिज मैदानावर तिरंगा यात्रा काढली. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते यदोपती ठाकूर यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी सर्वांना सीटीओजवळ रोखले होते. मात्र आरोपी थांबले नाहीत आणि रिजच्या मैदानावर घोषणाबाजी करत तिरंगा फडकवला.

Tiranga Yatra News, Tiranga Yatra In Shimla News
पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्यास बंदी, ईडीने जारी केले 'लूक आऊट सर्क्युलर'

या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे

शिमला पोलिसांच्या वतीने, आता हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि शिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह, युवक काँग्रेसचे नेते यदोपती ठाकूर, छत्तर सिंग, राहुल मेहरा, वीरेंद्र बंशू, अमित ठाकूर, राहुल चाहौन, दिनेश चोप्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खुरानासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tiranga Yatra News, Tiranga Yatra In Shimla News
पत्रकार झाला दहशतवादी, सापळा रचून सुरक्षा दलाने केले ठार

काय म्हणाले विक्रमादित्य सिंह

तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह म्हणाले की, तिरंगा फडकवल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण काहीही झाले तरी तिरंग्याच्या सन्मानाचा आदर आम्ही कधीच विसरणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com