Punjab Election 2022: 'जनतेच्या समस्यांसाठी भाजप अजूनही नेहरुंनाच दोष देतोय'

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांनी म्हटले, 'लोकांना काँग्रेसचे चांगले काम आठवत आहे.'
Former Prime Minister Manmohan Singh
Former Prime Minister Manmohan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या तीन दिवसात पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याच पाश्वभूमीवर भाजप, कॉंग्रेस, आम आदमी पक्षासह राज्यातील स्थानिक पक्ष एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आता पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी म्हटले, 'लोकांना काँग्रेसचे चांगले काम आठवत आहे.' (Manmohan Singh Has Said That BJP Is Still Blaming Nehru For The Problems Of The People)

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस (Congress) नेते मनमोहन सिंग यांनी गुरुवारी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी यावेळी म्हटले, 'सात वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेला भाजप अजूनही जनतेच्या समस्यांसाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोष देत आहे.'

Former Prime Minister Manmohan Singh
Punjab Election 2022: काँग्रेसला मोठा धक्का, तीन कॉंग्रेसी झाले 'आप' वासी

विस निवडणुकीपूर्वी पंजाबी भाषेत व्हिडिओ जारी

पंजाबी भाषेत व्हिडीओ संदेश जारी करताना मनमोहन सिंग म्हणाले की, ''एकीकडे लोक महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत, तर दुसरीकडे आपली चूक मान्य करुन सुधारणा करण्याऐवजी सत्तेत आलेले विद्यमान मोदी सरकार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंना दोष देत आहे.''

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलन, परराष्ट्र धोरण, महागाई आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला. काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी कधीही देशाचे विभाजन केले नसल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.

Former Prime Minister Manmohan Singh
Punjab Election 2022: राहुल गांधी आज पंजाब दौऱ्यावर

मोदींना टोमणे - आमंत्रण न देता बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत

सिंग पुढे म्हणाले की, राजकारण्यांना मिठी मारणे किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खाणे यामुळे संबंध सुधारत नाहीत. भाजप सरकारचा राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे. मोदी सरकार सातत्याने घटनात्मक संस्था कमकुवत करत आहे.

ते पुढे असेही म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या नावाखाली मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि राज्यातील जनतेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शेतकरी आंदोलनाच्या काळातही पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले.'

Former Prime Minister Manmohan Singh
Punjab Election: जालंधरच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले...'नया पंजाब कर्जमुक्त होणार'

मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, ''पंजाबींच्या शौर्याला, देशभक्तीला आणि बलिदानाला जग सलाम करते, परंतु एनडीए सरकारने यावर काहीही बोलत नाही. पंजाबमध्ये राहणारा एक सच्चा भारतीय म्हणून या सर्व गोष्टींनी मला खूप त्रास दिला आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com