Prime Minister Modi: आई हिराबेन यांची भेट घेण्यासाठी PM मोदी रुग्णालयात दाखल, Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. यानंतर त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Prime Minister Modi
Prime Minister Modi Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Prime Minister Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी अचानक खालावली. यानंतर त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये हीराबेन यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले आहे. कफाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थंडीच्या मोसमात कफ येण्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. हा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. येथे ते आई हिराबेन यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. हीराबेन रुग्णालयात दाखल आहेत.

दरम्यान, हीरा बा यांच्या आज अनेक वैद्यकीय तपासण्या झाल्या. विशेष म्हणजे, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजपचे आमदार आणि इतर मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर (Hospital) पोहोचले आहेत. आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी पीएम मोदीही अहमदाबादला पोहोचणार असल्याची बातमी आली होती.

Prime Minister Modi
100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन यांचे पाय धुवून घेतले आशीर्वाद

4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईची शेवटची भेट घेतली होती

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव भूपेंद्र पटेलही दुपारी रुग्णालयात पोहोचले. राज्याचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल हेही रुग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्रीही रुग्णालयात आहेत. गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 डिसेंबर रोजी मोदींनी त्यांच्या आईची शेवटची भेट घेतली होती.

Prime Minister Modi
PM Narendra Modi: आधी भावाचा अपघात, आता आई आजारी; दोन दिवसात PM मोदींवर दोन मोठी संकटे

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चारच्या सुमारास अहमदाबादला पोहोचतील असे सांगण्यात आले होते. अहमदाबादचे महापौर किरीट परमार, आरोग्य मंत्री हृषीकेश पटेल, माजी गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा हे यूएन मेहता रुग्णालयात पोहोचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com