100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन यांचे पाय धुवून घेतले आशीर्वाद

आईची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी त्यांचे भाऊ पंकज मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले
PM Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthday
PM Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthdayTwitter
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचा आज 100 वा वाढदिवस आहे . यावेळी त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी त्यांचे भाऊ पंकज मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि सुमारे अर्ध्या तासाच्या बैठकीनंतर ते तेथून निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, यानिमित्ताने वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचेही आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पीएम मोदी सहभागी होणार आहेत. (PM Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthday)

याशिवाय पावागड येथील माँ काली मंदिरातही पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करणार आहेत. यानिमित्ताने गांधीनगर येथील रायसन पेट्रोल पंपापासून 60 मीटर रस्त्याचे ‘पूज्य हिरा मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गांधीनगर महानगरपालिका पूज्य हिरा मार्गाचे नामकरण करणार आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांच्या आईची भेट घेतली होती.

PM Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthday
भारताने रशियापुढे ठेवला रुपयात तेल-शस्त्रे खरेदीचा प्रस्ताव, ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता

कोविड-19 साथीच्या आजारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या आईची भेट घेतली. याशिवाय, आज वडोदरा दौऱ्यात पंतप्रधान मोदी सुमारे 4 लाख लोकांना संबोधित करणार आहेत, ज्यात विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश असेल. सरदार इस्टेटजवळील कुष्ठरोग रुग्णालयात हा कार्यक्रम होणार आहे.

जूनमध्ये पंतप्रधानांचा दुसरा गुजरात दौरा

या महिन्यातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा गुजरात दौरा असेल. तत्पूर्वी, 10 जून रोजी, त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान, त्यांनी नवसारीच्या आदिवासी भागात 3,050 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्याच्या उद्देशाने 14 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली.

PM Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthday
PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 1, 2, 5, 10 अन् 20 रुपयांची नाणी करणार जारी

कार्यक्रमासाठी विशेष तयारी

आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या दौऱ्याची तयारी जोरात सुरू आहे. अधिकृत निवेदनानुसार, कार्यक्रमस्थळी जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या विशेष घुमटांसह विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यांचे कार्पेटिंग, पार्किंग सुविधा, दिवाबत्ती आणि अनुषंगिक सुविधांचे कामही पूर्णत्वास आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय पथकेही घटनास्थळी तैनात असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com