Telangana Governor on Women: 'सुसंस्कृत आणि देशभक्त बाळांना जन्म देण्यासाठी गर्भवती महिलांनी...', तेलंगणाच्या राज्यपालांचं वक्तव्य

Telangana Governer: गर्भवती महिलांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी मुलांना जन्म देण्यासाठी 'सुंदरकांड'चे पठण करावे.
Telangana Governer Tamilisai Soundararajan
Telangana Governer Tamilisai SoundararajanDainik Gomantak

Telangana Governor on Women: गर्भवती महिलांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी मुलांना जन्म देण्यासाठी 'सुंदरकांड'चे पठण करावे. रामायण सारखे महाकाव्यही वाचावे, असे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन म्हणाल्या.

रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न संस्थेच्या 'गर्भ संस्कार' कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सौंदरराजन यांनी हे वक्तव्य केले. त्या स्त्रीरोगतज्ञ आणि भ्रूणतज्ज्ञ देखील आहेत.

दरम्यान, संवर्धिनी न्यासच्या 'गर्भ संस्कार' कार्यक्रमांतर्गत, संस्थेशी संबंधित डॉक्टर गरोदर मातांना "वैज्ञानिक आणि पारंपारिक" उपायांबद्दल मार्गदर्शन करतील, जेणेकरुन त्या "सुसंस्कृत आणि देशभक्त" बाळांना जन्म देऊ शकतील, असेही त्या पुढे म्हणाल्या.

Telangana Governer Tamilisai Soundararajan
Telangana CM KCR: तेलंगणात राज्यपालांमुळे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची 'दांडी'

दुसरीकडे, ऑनलाइन जारी केलेल्या 'गर्भ संस्कार' मोड्यूलनुसार, या उपायांमध्ये भगवद्गीता, संस्कृत मंत्रांचा जप आणि योगाभ्यास यासारख्या धार्मिक ग्रंथांचे पठण समाविष्ट असेल.

ही प्रक्रिया गर्भधारणापूर्व अवस्थेपासून प्रसूतीच्या टप्प्यापर्यंत सुरु होईल आणि मूल दोन वर्षांचे होईपर्यंत चालू राहील.

त्यानुसार, या कार्यक्रमादरम्यान गरोदर महिलांच्या (Women) कुटुंबीयांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संवर्धिनी न्यास ही राष्ट्र सेविका समितीची एक शाखा आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना, तमिलिसाई सौंदरराजन यांनी 'गर्भ संस्कार' कार्यक्रम मॉड्यूल विकसित करण्याच्या संवर्धिनी न्यासच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Telangana Governer Tamilisai Soundararajan
PM Modi In Telangana: "मी रोज 2-3 किलो शिव्या खातो पण.." पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घाव

त्या पुढे म्हणाल्या की, “खेड्यात, आम्ही गर्भवती महिलांना रामायण, महाभारत आणि इतर महाकाव्यांसह चांगल्या कथा वाचताना पाहिले आहे.

विशेषत: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) गर्भवती महिलांनी कंबा रामायणाच्या सुंदरकांडाचे पठण करावे, अशी श्रद्धा आहे.''

राज्यपाल सौंदरराजन पुढे असेही म्हणाल्या की, गरोदरपणात "सुंदरकांड" पाठ करणे "मुलांसाठी खूप चांगले" असेल. "सुंदरकांड" हा "रामायण" चा अध्याय आहे. संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संवर्धिनी न्यासशी संबंधित डॉक्टरांकडून 'गर्भसंस्कार' कार्यक्रम देशभरात राबवण्यात येणार आहे.

Telangana Governer Tamilisai Soundararajan
Karnataka Politics: 'RSS-बजरंग दलावर बंदी घातल्यास काँग्रेसची राख होईल...,' भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

संवर्धिनी न्यासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "या उद्देशासाठी आम्ही देशाची पाच झोनमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक झोनमध्ये 10 डॉक्टरांची एक टीम असेल जी हा कार्यक्रम राबवतील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com