PM Modi In Telangana: "मी रोज 2-3 किलो शिव्या खातो पण.." पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घाव

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाही राजकारणचा आरोप केला.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाही राजकारणचा आरोप केला. मोदी म्हणाले, राज्यासाठी जनता प्रथम आहे, कुटुंब नाही. पंतप्रधानांनी केसीआर यांच्या अंधश्रद्धेवर देखील निशाणा साधत, सामाजिक न्यायात हा सर्वात मोठा अडथळा बनत असल्याचे ते म्हणाले.

PM Modi
Vir Das:...तोपर्यंत विरोध कायम; गोव्यात कॉमेडियन वीर दास विरोधात हिंदू संघटना आक्रमक

विरोधी पक्ष युती करण्याचा प्रयत्न करीत आहेत, कारण त्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीची भीती वाटते. तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटवर भर दिल्याने भ्रष्टाचारात लक्षणीय घट झाली असून, डिजिटल व्यवहारात ट्रॅक ठेवता येतो.असे मोदी म्हणाले.

“जन धन, आधार आणि मोबाईल या त्रिशक्तीच्या आधारे आम्ही सर्व बनावट लाभार्थींना हविण्यात यशस्वी झालो आहोत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आधी गरिबांचे पैसे आणि रेशनची फसवणूक केली जात होती. बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला थकवा कसा येत नाही. कारण मी दररोज 2-3 किलो शिव्या खातो... देवाने मला असा आशीर्वाद दिला आहे की या शिव्या माझ्या शरिराला पोषक ठरतात."

PM Modi
53rd Iffi Goa: मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन'चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर 

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, मला शिव्या द्या, भाजपला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिवीगाळ केली तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात केंद्राच्या विकास योजनांना जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Modi government political challenge
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com