प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित; पदावरही शिक्कामोर्तब

गेल्या काही आठवड्यांत किशोर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सततच्या बैठका घेतल्या आहेत. यादरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली आहे.
Prashant Kishor
Prashant KishorDainik Gomantak

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळू शकतो अशी चर्चा रंगत आहे. ते लवकरच काँग्रेसचा भाग बनणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. एवढेच नाही तर पक्षाने त्यांच्यावर जबाबदारीची धुरा निश्चित केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही आठवड्यांत किशोर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सततच्या बैठका घेतल्या आहेत. यादरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली आहे. (Prashant Kishor entry into Congress confirmed Sealed on the post too)

Prashant Kishor
प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, घरही पेटवले

माध्यमांच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले आहे की, यावेळी किशोरचे काँग्रेसमध्ये जाण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहेत. ते आता लवकरच पक्षात प्रवेश करू शकतात. पक्षाने त्यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका निश्चित केल्याचेही सांगण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून पक्षप्रमुख सोनिया गांधी या भूमिका मांडणार आहेत.

येथे, किशोर यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी स्थापन केलेल्या एका विशेष टीमला किशोर यांनी पूर्णपणे काँग्रेसशी एकनिष्ठ राहावे आणि इतर पक्षांशी संबंध तोडावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत देखील काम केले होते.

Prashant Kishor
'PM मोदींच्या मास्टरस्ट्रोकने जनतेच्या हातातील पैसा केला गायब'

अहवालानुसार, किशोर यांना राष्ट्रीय स्तरावर भूमिका हवी आहे आणि त्यांना कोणत्याही एका पक्षाशी बांधून ठेवायचे नाहीये, असे पक्षाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे निवडणूक रणनीतीकारांना पक्षात सामावून घेण्याचे आणि त्यांना बदल करण्याची संधी देण्याचे समर्थक करत आहेत. किशोर यांचा "प्रवास एका पक्षाकडून दुसर्‍या पक्षात झाला आहे" असे ते म्हणाले. "म्हणून या प्रकारची राजकीय बांधिलकी किंवा विचारसरणीची बांधिलकी स्पष्ट झाली नव्हती," असंही सिंग म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'पण आता त्यांनी काही ठोस सूचना पुढे केल्या आहेत आणि त्यांनी दिलेले सादरीकरण देखील चांगले आहे.' किशोर यांनी गेल्या वर्षी पक्षासमोर पहिले सादरीकरण केले आहे. त्याच वेळी, सध्याच्या योजनेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाहीये. किशोर यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसमोर देखील सादरीकरण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com