प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, घरही पेटवले

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातून पाच जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे
Uttar Pradesh
Uttar PradeshDainik Gomantak

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातून पाच जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सर्व लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. ही घटना प्रयागराजमधील (Prayagraj) तरवाईच्या खैवाजपूर गावातील आहे. जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामध्ये दाम्पत्यासह त्यांची सून आणि 2 वर्षांच्या नातीचा समावेश आहे. सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करुन जीवे मारण्यात आले आहे.

दरम्यान, हा गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली. घरातून धूर येत असल्याचे पाहून ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये राम कुमार यादव (55), त्यांची पत्नी कुसुम देवी (52), मुलगी मनीषा (25), सून सविता (27) आणि नात मीनाक्षी (2) यांचा समावेश आहे. तर दुसरी नात साक्षी (5) जिवंत सापडली आहे. खून कोणी आणि का केला याबाबत अद्याप मिळालेली नाही.

Uttar Pradesh
प्रशांत किशोर लवकरच धरणार काँग्रेसचा हात?

तसेच, प्रयागराजचे (Prayagraj) डीएम आणि एसएसपी आणि इतर पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार या पाच जणांची हत्या करण्यात आली. तरुणीवर बलात्कार झाल्याच्या संशयावर पोलिसांनी (Police) शवविच्छेदनानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार असल्याचे सांगितले. याआधी 16 एप्रिलला प्रीती तिवारी (38) आणि तिच्या तीन मुली माही (12), पिहू (8) आणि कुहू (3) यांची प्रयागराजमधील नवाबगंजमधील खगलपूर गावात गळा चिरून हत्या करण्यात आली होती, तर पती राहुल तिवारी (42). लटकलेले आढळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com