Punjab Govt Land in Goa: गोव्यातील 8 एकर जमीन दिली फाईव्ह स्टार हॉटेलला; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची होणार चौकशी

ही जमीन केवळ शेती किंवा वृक्षारोपणासाठी वापरली जाऊ शकते
Punjab Govt Land in Goa | CharanjitSingh Channi
Punjab Govt Land in Goa | CharanjitSingh Channi Dainik Gomantak
Published on
Updated on

Punjab Government Land in Goa: बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी पंजाबमधील दक्षता आयोगाच्या चौकशीला सामोरे जात असलेल्या माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाही.

कारण पंजाब सरकारने गोव्यातील पंजाब सरकारची जमिन एका हॉटेलला भाडेतत्वावर अत्यंत स्वस्तःत दिल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्न यांच्या काळात हा करार झाला होता. गोव्यात मोक्याच्या ठिकाणी समुद्र किनारी ही पंजाब सरकारची जागा आहे.

ही एकूण आठ एकर जमीन आहे. ही जमीन स्वस्त दरात भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्याचा तपास दक्षता विभागाने सुरू केला आहे. ही जमीन पाच मजली हॉटेलला देण्यात आली आहे. ही हॉटेल फ्रँचायजी प्रसिद्ध आहे.

Punjab Govt Land in Goa | CharanjitSingh Channi
Kolhapur-Panaji Bus Accident: कोल्हापूर-पणजी खासगी बसला अपघात; प्रवासी झोपेत असताना अचानक...

मात्र, याबाबत दक्षता विभागाने अद्याप कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षता विभाग या प्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्याची तयारी करत आहे. विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित विभागाला जमिनीशी संबंधित नोंदी दक्षता विभागाकडे सोपवण्याचे आणि तपास पथकाला त्वरीत तपास करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

पंजाब सरकारची गोव्यातील आठ एकर जमीन केवळ शेती किंवा वृक्षारोपणासाठी वापरली जाऊ शकते. गोव्याच्या नवीन पर्यटन धोरणांतर्गत ही जमीन एक लाख रुपये प्रति महिना या दराने भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

Punjab Govt Land in Goa | CharanjitSingh Channi
Goa Students Career Guidance: गुड न्यूज! सरकार करणार करियर मार्गदर्शन; राज्यातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना चन्नी सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यादरम्यान त्यांच्याकडे गोव्यातील पंजाब सरकारच्या जमिनीची माहिती होती. कारण त्या काळात अनेक हॉटेल कंपन्या पंजाब सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या.

कॅप्टन मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी ही जागा भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता दिली.

दक्षता विभागाचे पथक सध्या संबंधित विभागाकडून नोंदी मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यावरून ही जमीन कोणत्या वापरासाठी व कोणत्या निकषानुसार दिली हे कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com