ED raids Senthil Balaji: ईडीचा छापा, मंत्र्याची जोरजोरात रडारड आणि आता बायपास सर्जरी; नाट्यमय घडामोडींनी रंगली ईडी ची छापेमारी

Tamilnadu News: सक्तवसुली संचालनालयाने तामिळनाडूचे उर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि इतर काहींच्या ठिकाणांवर मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून छापे टाकले.
V Balaji  Senthil
V Balaji SenthilDainik Gomantak

ED arrests Tamilnadu Energy Minister Balaji Senthil

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून तामिळनाडूचे उर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि इतर काहींच्या जागेवर छापे टाकले.

यावेळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असताना ऊर्जामंत्री रडू लागले. त्यानंतर लगेचच, बुधवारी पहाटे कडेकोट बंदोबस्तात ईडीने बालाजी यांना चेन्नईच्या ओमंडुरार सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले.

या द्रमुक नेत्याला रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालयाबाहेर जोरदार नाट्य पाहायला मिळाले. ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी त्यांचे समर्थक तेथे जमले असताना ते कारमध्ये वेदनेने विव्हळत आणि रडताना दिसले.

बालाजी यांची बायपास सर्जरी होणार

तामिळनाडू सरकारचे मंत्री सेंथिल बालाजी यांना बुधवारी पहाटे ईडीने अटक केली. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तामिळनाडू सरकारमधील उर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्यावर आता बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

रुग्णालयात त्यांची कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली, त्यानंतर बायपास शस्त्रक्रियेची शिफारस करण्यात आली.

उर्जा मंत्र्यांना ताब्यात घेतल्याने गदारोळ

सध्या सेंथिल बालाजी ऊर्जामंत्री आहेत. मात्र याआधी ते AIADMK सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. याच कालावधीत Cash For Job घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. यावरून तामिळनाडूत खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ईडीची ही कारवाई केंद्र सरकारची सूडाची कारवाई असल्याचे म्हटले आहे. बुधवारी सकाळी एक मोठा नाट्य घडला जेव्हा कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नेले तेव्हा मंत्री बालाजी ढसाढका रडू लागले.

V Balaji  Senthil
Kerala High Court: याचिकाकर्त्याची सुनावणीला दांडी, याचिकेवर पुनर्विचार करण्यासाठी HC ने सुनावली अशी सजा; तुम्हीच वाचा

तब्बल 18 तास चौकशी केली

मंगळवारी, बालाजी AIADMK सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना परिवहन नोकरी घोटाळ्याप्रकरणी बालाजीच्या करूर निवासस्थानावर आणि राज्य सचिवालयातील त्यांच्या कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

मंत्र्यांची त्यांच्या निवासी व कार्यालयात सुमारे 18 तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

V Balaji  Senthil
Earthquake In Jammu-Kashmir: जम्मु-काश्मिरमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.3 तीव्रता

द्रमुकच्या नेत्यांचे गंभीर आरोप

कडेकोट बंदोबस्तात बालाजीला वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईच्या ओमंडुरार सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तपास यंत्रणेने मंगळवारी द्रमुक नेत्याला त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले.

डीएमकेच्या नेत्यांनी आरोप केला आहे की बालाजीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत असताना छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. सेंथिल बालाजीला ईडीने रुग्णालयात नेले तेव्हा ते शुद्धीवर नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com