Modi's web 3 lenses: मोदींच्या 'या' चष्प्याची खासियत माहितेय का?

मेटावर्सची घेतली अनुभुती, २०२४ पर्यंत मेटावर्स उद्योगाची उलाढाल पोहचणार ८०० मिलियन डॉलरवर
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

Modi's web 3 lenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असलेला चष्मा परिधान करून अनोखी अनुभुती घेतली. हा चष्मा साधासुधा नाही तर चक्क मेटावर्स टेक्नॉलॉजी दाखवून देणारा आहे. वेब 3 तंत्रज्ञानाने युक्त असलेला हा चष्मा मेटावर्सच्या दुनियेची सफर घडवून आणतो.

PM Narendra Modi
Modi Drives Car: मोदींनी दिल्लीत बसून चालवली युरोपातील कार

राजधानी दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेसचे सहावे पर्व सध्या खूपच चर्चेत आहे. तंत्रज्ञानातील नवनवे अविष्कार येथे पाहण्यात येत आहेत. भविष्यातील मानवी जीवनाला आकार देऊ शकतील, असे तंत्रज्ञान असलेल्या अनेक डिव्हायसेसचे डेमो येथे पाहता येऊ शकतात.

याच इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बसून युरोपमधील कार चालवली होती. आणि आता येथेच मोदींनी या वेब 3 तंत्रज्ञानाच्या चष्म्याची अनोखी अनुभूती घेतली. वेब ३ हे तंत्रज्ञान वेब २ च्या पुढची अद्ययावत पायरी आहे. सध्या आपण सर्व वेब २ वापरत आहोत. काही ठिकाणी वेब ३ चा वापर सुरू झाला आहे.

मेटावर्समुळे जगात मोठे बदल घडून येणार आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान मानले जात असलेल्या या मेटावर्सच्या वापराने आपण सत्य आणि आभासी जीवन यातील फरकच विसरून जायची शक्यता आहे. मेटावर्स हे एक मायावी जग असणार आहे. येथे तुमची उपस्थिती आभासी असेल किंवा खोटी असेल पण तेथील काम मात्र खरे असेल.

PM Narendra Modi
PM Modi's Video: रूग्णवाहिकेला वाट देण्यासाठी मोदींनी थांबवला ताफा

ब्लू्मबर्ग इंटेलिजन्सच्या अंदाजानुसार 2024 पर्यंत मेटावर्सच्या बाजारपेठेत 800 मिलियन डॉलरची उलाढाल होऊ शकते. मानवाच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या १४ तंत्रज्ञानामध्ये बँक ऑफ अमेरिकेने मेटावर्सचा समावेश केला आहे.

काय आहे मेटावर्स?

हे एक आभासी जग आहे. यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही व्हर्च्युअल आयडेंटिटीद्वारे डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू शकता. म्हणजे तुम्ही शरिराने तिथे नसता पण तुमचे एख रूप तिथे उपस्थित असते. ही एक वेगळी दुनिया आहे आणि येथे तुमची ओळखही वेगळी असते.

व्हर्च्युअल हेडसेटद्वारे तुम्ही या दुनियेत प्रवेश करू शकता. येथे आपले आणि आपल्या मित्रांचे थ्रीडी अवतार असतील. त्याद्वारे आपण सर्व काही करू शकतो. या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक लोक पैसे मोजून या सेवांचा फायदा घेतील तर अनेक लोक यास सेवा देऊन पैसे कमावतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com