PM Modi's Video: रूग्णवाहिकेला वाट देण्यासाठी मोदींनी थांबवला ताफा

गुजरात दौरा; गांधीनगर-मुंबई वंदे भारत रेल्वेगाडीची सुरवात
PM Modi Ambulance
PM Modi Ambulance Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi's Convoy: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते अहमदाबादहून गांधीनगर येथे जात असताना मोदींनी रूग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता देण्यासाठी आपला ताफा (Convoy) थांबवला आणि रूग्णवाहिकेस वाट करून दिली.

PM Modi Ambulance
5G Launch In India: PM मोदींच्या हस्ते उद्या 5 जी सेवेची सुरुवात

मोदींच्या (PM Narendra Modi) या कृतीचे कौतूक केले जात आहे. दरम्यान, गांधीनगर येथे मोदींनी देशातील तिसऱ्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. गांधीनगर ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ही रेल्वे धावणार आहे. यावेळई पंतप्रधान मोदींनी गांधीनगरपासून कालुपूर पर्यंत या नव्या रेल्वेतून प्रवासही केला. त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी, महिला उद्योजक, अनेक युवक उपस्थित होते. मोदींनी रेल्वेच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जात तेथिल तांत्रिक माहितीही जाणून घेतली.

मोदी म्हणाले की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मल्टी ट्रान्सपोर्टेशनबाबत एक मोठी परिषद घेतली होती. पण तेव्हा केंद्रात दुसऱ्या पक्षाचे सरकार होते. त्यामुळे तेव्हा मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही. पण तुम्ही मला दिल्लीला पाठवले आणि मी ते स्वप्न पुर्ण केले. 8 वर्षांच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक रेल्वेत केली गेली आहे. देशात दोन डझनहून अधिक शहरात मेट्रोचे काम पुर्ण झाले आहे किंवा सुरू आहे.

PM Modi Ambulance
Congress President Election: खर्गे तयार, दिग्विजयांची माघार; अध्यक्षपदासाठी शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे मैदानात

तत्पुर्वी मोदींनी अहमदाबादच्या फेज वन मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी अंबाजी मंदिरात दर्शन घेतले. अंबाजी येथे मोदींनी कोट्यवधींच्या योजनांची सुरवात केली.

गुरूवारी मोदींनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले होते.देशातील १५ हजारहून अधिक खेळाडू या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. देशातील विविध राज्यातील २५ हजार हून अधिक कॉलेजचा यात सहभाग आहे. यावेळी मोदींसोबत ऑलिंपिक पदक विजेते पी. व्ही. सिंधु, नीरज चोप्रा हे देखील उपस्थित होते. त्यानंतर जीएमडीसी मैदानात त्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती केली होती. काहीकाळ त्यांनी गरबाही पाहीला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com