Modi Drives Car: देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या पर्वाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मोदी हे 5 जी (5G) तंत्रज्ञानाद्वारे झालेल्या एका अनोख्या प्रयोगाचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरले. मोदींनी चक्क दिल्लीत बसून युरोपमध्ये कार चालवली.
या इव्हेंटमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील निवडक 13 शहरात 5 जी सेवेच्या पहिल्या फेजची सुरवात करण्यात आली. यावेळी मोदी हे एरिक्सन या कंपनीच्या बूथवर गेले. तिथे त्यांनी 5 जी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने युरोपमधील स्वीडन या देशातील कार नियंत्रित केली. पंतप्रधान मोदी या बुथवर असलेले गाडीचे स्टेअरिंग ऑपरेट करत होते आणि त्याबरहुकुम तिकडे युरोपात स्वीडनमध्ये ती कार नियंत्रित होत होती.
याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ पंतप्रधांच्या नरेंद्र मोदी या यु ट्युब चॅनेलवर आहे. या व्हिडिओमध्य दिसते की, मोदी त्यांच्यासमोरील स्टेअरींगने कार नियंत्रित करत आहेत. त्यांच्या समोरील पडद्यावर कारच्या चाकांची हालचाल दिसत आहे. जवळपास 5 मिनिटे मोदींनी ही कार चालविण्याचा अनुभव घेतला.
5 जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही किमया शक्य झाली. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच स्वीडनमधील ही कार दिल्लीशी कनेक्ट केली गेली होती. ही कार चालवत असताना पंतप्रधान मोदी कंपनीच्या स्टाफकडून याबाबतची माहितीही घेत हे नवतंत्रज्ञान समजून घेत होते. या परिषदेत मोदींनी तंत्रज्ञानाच्या इतरही काही करामतींचा अनुभव घेतला.
आकाश अंबानी यांनी मोदींना दिला 5जी उपकरणाचा डेमो
या इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रिलायन्स जिओच्या पॅव्हेलियनमध्ये गेले. तिथे त्यांनी 5जी डिव्हाईसेस पाहिली. मोदींनी 'जिओ ग्लास'द्वारे व्हर्च्युअल रिअॅलिटीचा रियल टाईम अनुभव घेतला.
त्यांनी इंजिनिअर्सकडून एंड टू एंड 5जी टेक्नॉलॉजीच्या विकासाची माहितीही घेतली. जिओ टेलीकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी स्वतः मोदींना या 5 जी उपकरणांचा डेमो दाखवला. यावेळी उद्योगपती आणि आकाश यांचे वडील मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.