पाकिस्तानात शीख बांधवांची गोळ्या झाडून हत्या

कुलजीत सिंग आणि रणजित सिंग यांना हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या, दोन्ही भाऊ किराणा दुकान चालवायचे. दोघांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan Crime News
Pakistan Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानातील पेशावरमधील बडा भागात दोन शीख बांधवांवर गोळ्या झाडण्यात आल्या. कुलजीत सिंग आणि रणजित सिंग यांना हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. दोन्ही भाऊ किराणा दुकान चालवायचे, या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.

(Sikh brothers shot dead in Pakistan)

Pakistan Crime News
रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संसद गट पोहोचले झेलेन्स्कीच्या भेटीला

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या घटनेची दखल घेतली आहे. आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. सीएम खान म्हणाले की ही घटना अत्यंत निंदनीय आणि दुःखद आहे आणि या हत्येमध्ये सहभागी असलेले घटक कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना म्हणजे शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न आहे. असे प्रयत्न प्रांत सरकार यशस्वी होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या आठ महिन्यांत पेशावरमध्ये शीख समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये शीख 'हकीम' सरदार सतनाम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी ISIS शाखा ISKP ने स्वीकारली आहे. 45 वर्षीय सतनाम सिंग हे खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरमध्ये गेल्या 20 वर्षांपासून राहत होते. ते शहरातील चारसड्डा रोडवर 'धर्मंदर फार्मसी' हे क्लिनिक चालवत होते.

(Pakistan Crime News)

Pakistan Crime News
Sri Lanka Crisis: महिंदा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र!

गेल्या काही वर्षांत शीख समुदायावर हे हल्ले झाले आहेत

2020 मध्ये, पाकिस्तानातील पेशावरमध्ये 25 वर्षीय शीख रविंदर सिंगची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचा जन्म झालेल्या लाहोरमधील गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाने हल्ला केल्यानंतर एका दिवसात रविंदर सिंग यांचा मृत्यू झाला.

यापूर्वी 2018 मध्ये, शीख समुदायाचे प्रसिद्ध सदस्य चरणजीत सिंग यांची पेशावरमध्ये अज्ञात लोकांनी हत्या केली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ नॅशनल असेंब्लीचे सदस्य सोरेन सिंग यांची 2016 मध्ये पेशावरमध्ये हत्या करण्यात आली होती.

पेशावरमध्ये सुमारे 15,000 शीख राहतात. बहुतेक प्रांतीय राजधानीच्या शेजारच्या जोगन शाहमध्ये आहेत. पेशावरमधील शीख समुदायातील बहुतेक सदस्य व्यापारी आहेत, तर काही फार्मसी देखील चालवतात.

(Pakistan Latest News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com