निवडणूक असलेल्या 5 राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ

पाच राज्यांच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.
5 State Assembly  Election  2022
5 State Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पुढील महिन्यापर्यंत देशातील पाच राज्यांमध्ये नवीन विधानसभा (Assembly Election 2022) स्थापन होणार आहे. देशातील 20 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत तेथे राहतात. या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र येथे राहणाऱ्या सामान्य माणसाचे उत्पन्न तेवढे वाढलेले नाही.

पाच राज्यांच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आयकर भरताना गेल्या 5 वर्षात किती उत्पन्न सांगितले होते, हेही सांगण्यात आले आहे. आम्ही या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांची तुलना तेथील सामान्य माणसाच्या उत्पन्नाशी केली. यावरून मुख्यमंत्र्यांची कमाई कोट्यावधीत वाढल्याचे दिसून आले, पण सर्वसामान्यांचे उत्पन्न 10 हजारानेही वाढू शकले नाही.

  • पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कमाई आणि सर्वसामान्यांची कमाई

1. उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या संपत्तीत 5 वर्षात 60% वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत 60 लाखांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 1.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सीएम योगी यांनी 2020-21 मध्ये 13.20 लाख रुपयांचे उत्पन्न जाहीर केले होते.

सामान्य जनता: 2016-17 मध्ये, UP मध्ये दरडोई उत्पन्न 40,847 रुपये होते. 2020-21 पर्यंत हे उत्पन्न वाढून 41,023 रुपये झाले आहे. म्हणजेच 5 वर्षांत 500 रुपयांची कमाईही वाढलेली नाही. मात्र, 2019-20 मध्ये वार्षिक दरडोई उत्पन्न 44,618 रुपयांवर गेले होते.

2. पंजाब

मुख्यमंत्री : चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या संपत्तीत 5 वर्षात घट झाली आहे. 2017 मध्ये त्यांच्याकडे 14.51 कोटी रुपयांची संपत्ती होती. 2022 मध्ये त्यांनी 9.45 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. चन्नी यांनी 2019-20 मध्ये 27.64 लाखांच्या उत्पन्नावर कर जमा केला होता. त्यांची पत्नी डॉ. कमलजीत कौर यांनी 2020-21 मध्ये 26.21 लाख रुपये उत्पन्न घोषित केले होते.

सामान्य जनता : पंजाबमध्ये 2016-17 मध्ये सामान्य माणसाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1.05 लाख रुपये होते. 2020-21 पर्यंत येथील दरडोई उत्पन्न 1.09 लाख रुपये झाले आहे. म्हणजेच 5 वर्षात केवळ 4 हजार रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.

3. उत्तराखंड

मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) जुलै 2021 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजेच त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ खूपच कमी होता. मात्र पाच वर्षांच्या भाजप सरकारच्या काळात धामी यांच्या संपत्तीत 580 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017 मध्ये त्यांच्याकडे 49.15 लाख रुपयांची संपत्ती होती. त्यांच्याकडे 2022 मध्ये 3.34 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2020-21 साठी दाखल केलेल्या आयटी रिटर्नमध्ये त्यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.90 लाख रुपये आणि त्यांची पत्नी गीता धामी यांनी 5.19 लाख रुपये उत्पन्न असल्याचे घोषित केले होते.

सामान्य जनता: उत्तराखंडमध्ये, 2016-17 मध्ये दरडोई उत्पन्न 1.38 लाख रुपये होते. 2019-20 मध्ये येथील वार्षिक दरडोई उत्पन्न 1.58 लाख रुपये होते. हा आकडा कोरोना महामारीपूर्वीचा आहे. आतापर्यंत ज्या राज्यांची 2020-21 ची आकडेवारी आली आहे, तिथे सर्वत्र दरडोई उत्पन्नात घट झाली आहे.

5 State Assembly  Election  2022
UP Elections: अमित शहांचा आज यूपीसाठी जाहीरनामा, सीएम योगींची हजेरी

4. गोवा

मुख्यमंत्री : मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मार्च 2019 मध्ये प्रमोद सावंत (Pramod Sawant) मुख्यमंत्री झाले. प्रमोद सावंत यांच्या संपत्तीत 5 वर्षात 215% वाढ झाली आहे. 2017 मध्ये त्यांच्याकडे 2.78 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांच्याकडे 2022 मध्ये 8.76 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2020-21 च्या रिटर्नमध्ये त्यांनी 6.35 लाख रुपये आणि पत्नी सुलक्षणा सावंत यांनी 12.80 लाख रुपये उत्पन्न जाहीर केले होते.

सामान्य जनता: गोवा हे देशातील असे राज्य आहे की या राज्याचे दरडोई उत्पन्न संपूर्ण देशात सर्वाधिक आहे. त्याचे आकडे देखील 2019-20 पर्यंतच आहेत. आकडेवारीनुसार, 2016-17 मध्ये गोव्यातील दरडोई उत्पन्न 3.05 लाख रुपये होते, जे 2019-20 मध्ये 3.03 लाख रुपयांवर आले आहे.

5. मणिपूर

मुख्यमंत्री : एन. बिरेन सिंग (N. Biren Singh) यांच्या संपत्तीतही 5 वर्षात थोडीशी घट झाली आहे. 2017 मध्ये त्यांनी 1.56 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 2022 मध्ये त्यांच्याकडे 1.36 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, 2020-21 मध्ये त्यांनी दाखल केलेल्या आयटी रिटर्नमध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 24.23 लाख रुपये असल्याचे घोषित केले होते. त्याच वेळी, त्यांच्या पत्नीच्या 5.18 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्यात आला होता.

सामान्य जनता : मणिपूरचे दरडोई उत्पन्न 5 हजार रुपयांनी वाढले आहे. येथे 2016-17 मध्ये दरडोई उत्पन्न 47,151 रुपये होते, जे 2019-20 मध्ये वाढून 53,930 रुपये झाले.

5 State Assembly  Election  2022
Goa Election 2022: भाजपचा जाहीरनामा सादर करताना तानावडेंना आली पर्रीकरांची आठवण

10 फेब्रुवारीपासून निवडणुकीचा हंगाम सुरू होत आहे

पाच राज्यांच्या निवडणुकीचा हंगाम 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. यूपीमध्ये ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारीला होणार आहे.

14 फेब्रुवारी रोजी गोव्यातील सर्व 40 आणि उत्तराखंडमधील 70 जागांवर मतदान होणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याच वेळी, मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल १० मार्चला लागणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com