घराणेशाहीचा पक्ष लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधातच: PM नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींची विरोधी पक्षांवर टीका
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: ‘घराणेशाहीचा लोकशाहीला सर्वांत मोठा धोका आहे. घराणेशाहीमुळे युवक राजकारणात येण्यापासून रोखले जात आहेत. सार्वजनिक जीवनात येण्यास युवक घाबरत आहेत,’ अशी तीव्र टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोणत्याही पक्षाचे नाव न घेता केली. पाच राज्यांतील निवडणुकांसाठी (Assembly Election) पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. (PM Narendra Modi criticism of opposition parties)

PM Narendra Modi
गोंयकार काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत : चोडणकर

त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपवर (Goa BJP) विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तरेही दिली. मोदी म्हणाले, कुटुंबांशी संबंधित पक्ष लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाच्याच विरोधात असतात.एका कुटुंबातील दोन लोक निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून येऊन लोकसभेत गेले, तर तो एक राजकारणाचा भाग आहे. पण एकाच कुटुंबातले लोक पक्षातील वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असतील, तर त्यात कुठलेही ‘डायनॅमिक’ नसून फक्त ‘डायनेस्टी’ आहे.’ संसदेमध्ये बोलताना मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला होता. त्याबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, ‘‘मी कुणाच्या वडिलांविषयी, कुणाच्या आजोबांविषयी किंवा कुणाच्या आईविषयी काहीही बोललो नाही. मी देशाच्या माजी पंतप्रधानांचे (PM Narendra Modi) वक्तव्य काय होते हे सांगितले आहे. तुम्ही पंडित नेहरूंचे नाव घेत नाही, अशी टीका आमच्यावर केली जाते. आता त्यांचे नाव घेतले, तरीही टीका केली जात आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Kamareddy ATM Robbery
Greater Noida Delivery Riders Fight
CJP Ashutosh Ranka press conference
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com