PM मोदी 26 ते 28 जून रोजी जर्मनीसह UAE दौऱ्यावर

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी Schols Almau ला भेट देणार आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी Schols Almau ला भेट देणार आहेत. युक्रेन संघर्ष, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थिती, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान यासह महत्त्वाची जागतिक आव्हाने या परिषदेदरम्यान चर्चेत येणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली. (pm modi visit to germany uae from 26 june to 28 full details)

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, G-7 शिखर परिषदेसाठी विशेष निमंत्रित म्हणून भारताचा सहभाग जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यात महत्त्वाचा आहे.

Prime Minister Narendra Modi
Quad Summit 2022: PM मोदी राहणार उपस्थित, क्वाड म्हणजे काय अन् चीन का घाबरतो?

युक्रेन युद्धावर भारत आपली भूमिका स्पष्ट करेल

व्कात्रा पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 28 जून रोजी संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील, जिथे ते UAE चे माजी अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतील.' G7 शिखर परिषदेत युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर भारताची (India) भूमिका काय असेल, असे विचारले असता क्वात्रा म्हणाले की, 'युक्रेनचे संकट सुरु झाले तेव्हापासूनच भारताची भूमिका स्पष्ट आहे की लवकरात लवकर युद्धविराम झाला पाहिजे. हा प्रश्न संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवला गेला पाहिजे.'

Prime Minister Narendra Modi
'... आजच्याइतके कधीही चांगले संबंध नव्हते': पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ते पुढे म्हणाले की, युक्रेनच्या संकटामुळे अन्न, ऊर्जा सुरक्षा, उत्पादनांची महागाई, जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय या मुद्द्यांवर भारताने विविध मंचांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. क्वात्रा पुढे म्हणाले की, जागतिक मंचांवर भारताची भूमिका भारताच्या हितसंबंधांवर आणि तत्त्वांवरुन ठरते आणि त्याबद्दल कोणतीही शंका किंवा संकोच नसावा. G7 गट हा जगातील सात सर्वात श्रीमंत देशांचा समूह आहे, ज्याचे नेतृत्व सध्या जर्मनी करत आहे. या गटात ब्रिटन (Britain), कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका (America) यांचा समावेश आहे.

Prime Minister Narendra Modi
"मी स्वतःला सचिन तेंडुलकर अन् अमिताभ बच्चन समजतो ...:" पंतप्रधान बोरिस जॉन्सन

पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांना भेटणार आहेत

परराष्ट्र सचिवांनी पुढे सांगितले की, जर्मनीच्या अध्यक्षतेखाली G7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि इतर अनेक प्रमुख नेते सहभागी होत आहेत.

मोदी 2 मे रोजी जर्मनीला गेले होते

क्वात्रा म्हणाले की, जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन सत्रांना संबोधित करु शकतात, ज्यामध्ये एक सत्र पर्यावरण, ऊर्जा, हवामान या विषयांवर असेल आणि दुसऱ्या सत्रात अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांचा समावेश असेल. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी 2 मे रोजी जर्मनीला गेले होते, जिथे त्यांनी 6 व्या भारत-जर्मनी आंतरसरकारी सल्लागार बैठकीत भाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com