Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Modi Cabinet Reshuffle 2026: दिल्लीतील 'सेवा तीर्थ कॉम्प्लेक्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या 'चिंतन शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते.
Modi Cabinet Reshuffle 2026
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Modi Cabinet Reshuffle 2026: दिल्लीतील 'सेवा तीर्थ कॉम्प्लेक्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या 'चिंतन शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. या उच्चस्तरीय शिबिरामध्ये पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रत्येक मंत्रालयाने त्यांच्या कामाचे प्रेझेंटेशन केले. शिबिराच्या पहिल्या दिवशी 'विकसित भारत 2047' या दूरगामी व्हिजनवर भर देण्यात आला, ज्यामध्ये शासन व्यवस्था अधिक सुलभ करण्याचे आणि सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उपायांवर सखोल चर्चा झाली.

दरम्यान, राजकीय वर्तुळात या चिंतन शिबिरातील वर्क रिव्ह्यू रिपोर्टच्या आधारावर लवकरच मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जाऊ शकेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतन शिबिरात सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करुन त्यांना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ग्रेडिंग देण्यात आले. ज्या मंत्र्यांना 'एक्सीलेंट' किंवा 'गुड' श्रेणी मिळाली, ते 'ग्रीन झोन'मध्ये असून त्यांच्या पदाला सध्या कोणताही धोका नाही. मात्र, ज्यांना 'ॲव्हरेज' किंवा 'पुअर' ग्रेडिंग मिळाले, ते 'रेड झोन'मध्ये आले असून त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार कायम आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलामध्ये हाच रिपोर्ट कार्ड आणि ग्रेडिंगचा आधार बनणार आहे, म्हणजेच ज्या मंत्र्यांमध्ये 'विकसित भारत 2047' चे स्वप्न साकार करण्याची क्षमता सिद्ध होईल, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

सुमारे चार तास चाललेल्या या चिंतन शिबिराची सुरुवात मंत्र्यांच्या विविध गटांमधील चर्चेने झाली. खुद्द पंतप्रधान मोदींनी प्रत्येक गटाकडे जाऊन मंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मंत्रालयाच्या कामगिरीचा गोषवारा घेतला. शासन प्रणाली सर्वसामान्यांसाठी कशी सोपी करता येईल, देशाच्या आर्थिक विकासाला गती कशी देता येईल आणि सरकारी योजनांचा लाभ देशातील तरुण व महिलांपर्यंत कसा पोहोचवला जाईल, याबाबत पंतप्रधानांनी मंत्र्यांकडे विचारणा केली. या सत्रानंतर सर्व केंद्रीय मंत्रालयांनी त्यांच्या आगामी रोडमॅपचे सादरीकरण केले, ज्यावर पंतप्रधानांनी सविस्तर प्रश्नोत्तरी घेत योग्य त्या सूचना केल्या.

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

या चिंतन शिबिरामध्ये प्रामुख्याने चार प्रमुख विषयांवर सादरीकरणे सादर करण्यात आली. यामध्ये 'Gen-Z', महिला आरक्षण, यूजीसी आणि युवा रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. देशातील तरुणांच्या बदलत्या मानसिकतेशी ताळमेळ राखण्यासाठी मंत्र्यांनी काय प्रयत्न केले, Gen-Z चे नेमके प्रश्न काय आहेत आणि त्यांच्या भविष्यातील योजना काय आहेत, यावर चर्चा झाली. याशिवाय, संसदेच्या मागील सत्रात रखडलेले महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर कसे पास करुन घेता येईल, याबाबतही पंतप्रधानांनी मंत्र्यांकडून ठोस उपाय आणि सूचना मागवल्या असून आगामी राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com