Raksha Bandhan: कोलकाता बाजारात मोदी आणि ममता दीदी राखीचा ट्रेंड

कोलकाता, पश्चिम बंगालमध्येही रक्षाबंधन सण साजरा केला जातो. येथेही बाजारपेठांमध्ये बरीच हालचाल बघायला मिळाली.
PM Modi And mamta didi face printed rakhis
PM Modi And mamta didi face printed rakhis Twitter/ ANI
Published on
Updated on

रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा भाऊ -बहिणींचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बंद बाजारात लखलखाट परतला आहे. मात्र, कोविड नियमांचे (Covid-19) पालन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कडक सूचना देण्यात आल्या आहेत. असे असूनही बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.

PM Modi And mamta didi face printed rakhis
भारतीय भूमीवर पाय ठेवताच अफगाणिस्तानच्या खासदाराला अश्रू अनावर

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लोक बाजारात भरपूर खरेदी करतात. बाजारात दागिने आणि दगडी राख्यांनाही मोठी मागणी होती. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर इथल्या बाजारपेठांमध्येही खूप गर्दी होती. नागपुरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये सोने, चांदी आणि दगडांनी बनवलेल्या राख्यांच्या विक्रीला मोठी मागणी दिसून आली. सोने, चांदी, मोती इत्यादींनी बनवलेल्या राख्या सराफी दुकानात आल्या आहेत. दुकानदारांनाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोलकात्यात पीएम मोदी आणि सीएम ममता राखी ट्रेंड

कोलकाता, पश्चिम बंगालमध्येही रक्षाबंधन सण साजरा केला जातो. येथेही बाजारपेठांमध्ये बरीच हालचाल बघायला मिळाली. कोलकाताच्या कलाकर स्ट्रीटमध्ये स्थानिक लोकांनी पीएम मोदींच्या चेहऱा छापलेली राखी खरेदी केली. बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या सरबोनी भट्टाचार्य यांनी एएनआयला सांगितले की, बाजारात नवीन प्रकारच्या राख्या आल्या आहेत, ज्यात पीएम मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा चेहरा असलेल्या राखींचा समावेश आहे. मी पीएम मोदींचाचेहरा बघून राखी खरेदी करत आहे.

PM Modi And mamta didi face printed rakhis
मणिपूरचे नवे राज्यपाल म्हणून एल. गणेशन यांची राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com