पेगासस स्पायवेअरने भारतातील राजकारणात मोठे वादंग उडाले होते. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांने केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला होता. हा आरोप खोडण्यासाठी केंद्र सरकारने ही अनेकदा स्पष्टीकरण दिले. मात्र तरी ही या प्रकरणावरुन केंद्रसरकारच्या दिशेने असलेली संशयाची सुई विरोधी पक्षांकडून आज ही कायम आहे. हेरगिरी करणाऱ्या या सॉफ्टवेअरवरुन भारतात बराच गदारोळ झाला होता. (pegasus hermit spyware used to target high profile people )
लोकांची हेरगिरी करणारे असेच आणखी एक सॉफ्टवेअर समोर आले असून, ते पेगासससारखेच धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्याचे नाव 'हर्मिट स्पायवेअर' आहे. हे स्पायवेअर तयार करणाऱ्या संशोधकाने म्हटले आहे की, त्याच्या विश्लेषणावर आधारित, हर्मिट स्पायवेअर इटालियन स्पायवेअर विक्रेते RCS लॅब आणि टायकेलॅब Srl यांनी विकसित केले आहे. सायबर सुरक्षा कंपनी लुकआउट थ्रेट लॅबने याबाबत खुलासा केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता पेगासस ऐवजी नवीन अँड्रॉईड व्हर्जन स्पायवेअर हर्मिट वापरले जात आहे. याबाबत लुकआउटने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, या स्पायवेअरचा वापर अनेक देशांमध्ये लोकांची हेरगिरी करण्यासाठी केला जात आहे. या हेरगिरीत सरकारी अधिकारी, व्यापारी, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक त्याचे लक्ष बनत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे स्पायवेअर कझाकस्तानमध्ये आढळले आहे. तेथील सरकार लोकांची हेरगिरी करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. याआधी चार महिन्यांपूर्वी कझाकस्तान सरकारने जबरदस्तीने दडपलेल्या सरकारच्या धोरणाविरोधात या देशात निदर्शने करण्यात आली होती. सीरिया आणि इटलीमधील युजर्सच्या फोनमध्येही हे स्पायवेअर दिसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे अॅप पाकिस्तान, चिली, मंगोलिया, बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार आणि तुर्कमेनिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांशी संबंध आहेत.
हे अॅप फिशिंग हल्ल्यासारखे कार्य करते
लुकआउट कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हा एक मॉड्युलर स्पायवेअर आहे, जो डाउनलोड केल्यानंतर त्याचे काम सुरू करतो. याचा वापर कराताना टार्गेट मोबाईलमध्ये एसएमएसद्वारे इन्स्टॉल केले जाट आहे. आणि हे फिशिंग हल्ल्यासारखे आहे.
हर्मिट स्पायवेअर डाऊनलोड झाल्यानंतर लगेचच काम करण्यास सुरुवात करते, कारण ते ऑडिओ रेकॉर्ड करू शकते, कॉल करू शकते आणि रीडायरेक्ट करू शकते. हे कॉल लॉग, डिव्हाइस स्थान आणि एसएमएस डेटा गोळा करू शकते. असे ही सांगण्यात आले आहे की कंपनीला त्याच्या iOS आवृत्तीबद्दल देखील माहिती मिळाली आहे, परंतु अद्याप त्याचे नमुने सापडलेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.