'सुशिक्षित तरुणांसाठी मनरेगा...?', अग्निपथ योजनेवरुन तेजस्वी यादव यांचा केंद्रावर घणाघात

देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली.
RJD leader Tejaswi Yadav
RJD leader Tejaswi YadavDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी केंद्राच्या नव्या योजनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तरुणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या योजनेबाबत त्यांनी केंद्राला 20 प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देण्याचे आवाहनही केले. (mnrega for educated youth tejashwi yadav furious over agneepath scheme)

यासोबतच त्यांनी भाजप (BJP) नेत्यांना सीमेवर जाण्याचा सल्लाही दिला. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, त्यांनी प्रश्न केला की, ही सुशिक्षित तरुणांसाठी मनरेगासारखी योजना आहे की त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) काही "गुप्त अजेंडा" आहे.

RJD leader Tejaswi Yadav
Agnipath: राजस्थानसह या राज्यांनी केंद्राला केले आवाहन, 'तात्काळ योजना मागे घ्या'

सरकारने शंका दूर कराव्यात

पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी युवकांना योजनेच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले. या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तेजस्वी यांनी पुढे असेही सांगितले की, सरकार 'वन रँक, वन पेन्शन'ची चर्चा करते, परंतु सरकारने अग्निपथ योजनेच्या रुपात "नो रँक, नो पेन्शन" अशी योजना आणली आहे. सरकारला 20 प्रश्न विचारताना तेजस्वी पुढे म्हणाले की, 'लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, ज्या सरकारने दूर कराव्यात.'

RJD leader Tejaswi Yadav
'अग्निपथ' वर कोण बनणार 'माफीवीर', विरोधकांच्या रडारावर मोदी-शहा

विरोधकांवर आरोप

अग्निपथ योजना सैन्यात भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी का नाही, असा सवालही यादव यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलने होत आहेत आणि ज्यांना सैनिक बनायचे आहे ते संतप्त आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dharmendra Pradhan Reaction
Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
Constitutional right to protest India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com