Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Former CDS General Anil Chauhan Statement Operation Sindoor: पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताने 6 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीरीत्या राबवले.
Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Former CDS Anil Chauhan latest statement on Operation SindoorDainik Gomantak
Published on
Updated on

Former CDS General Anil Chauhan Statement Operation Sindoor: पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताने 6 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीरीत्या राबवले. भारतीय सशस्त्र दलांच्या तीव्र आणि अचूक हल्ल्यांसमोर पाकिस्तानला गुडघे टेकणे भाग पडले. या ऐतिहासिक लष्करी कारवाईला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर, भारताचे माजी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी या मोहिमेबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक खुलासा केला.

या मोहिमेची आखणी करतानाच, संघर्षातील शेवटचा आणि निर्णायक वार हा पाकिस्तानचा नसून भारताचा (India) असेल, या मुख्य सूत्रावर भर देण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान इराणनं पाकड्यांना दिली साथ, पाकिस्तानी उप-पंतप्रधानांचा मोठा गौप्यस्फोट; नॅशनल असेंब्लीत केलं वक्तव्य

एएनआई या वृत्तसंस्थेशी बोलताना माजी सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर'ची योजना आखताना एक अत्यंत स्पष्ट आणि ठोस 'एस्केलेशन मॅट्रिक्स' तयार करण्यात आले होते. लष्करी संघर्षाच्या परिस्थितीत विजयाची अंतिम रेषा किंवा शेवटचा प्रहार भारताच्याच बाजूने असणे राजकीय आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत आवश्यक होते. हे ऑपरेशन पूर्वीच्या सैन्य मोहिमांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळे होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या मोहिमेदरम्यान भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यांनी आपल्या क्षमता आणि रणनीतीबाबत राजकीय नेतृत्वासमोर पूर्ण एकजूट दाखवली.

Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

भारताच्या बदलत्या लष्करी रणनीतीचा उल्लेख करताना जनरल चौहान म्हणाले की, उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जमिनी मार्गाचा वापर केला होता. त्यानंतर पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल बालाकोट कारवाईत भारतीय हवाई दलाच्या अफाट शक्तीचे प्रदर्शन घडवून आणले गेले. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने अगदी वेगळा मार्ग निवडत 'लोअर एअरस्पेस' वापरण्याची अत्यंत प्रभावी रणनीती आखली होती.

Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

शेवटी माजी सीडीएस चौहान यांनी अधोरेखित केले की, कोणतीही लष्करी कारवाई ही केवळ शस्त्रास्त्रांच्या वापरापुरती मर्यादित नसते, तर त्यामागे देशाचे राजकीय आणि धोरणात्मक उद्दिष्ट दडलेले असते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, भारतावर होणारा प्रत्येक हल्ला अत्यंत महागात पडेल आणि संघर्षाचा अंतिम निर्णय हा भारतीय लष्कराच्याच अटींवर घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com