डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

Oneindia New AI Platform: 'Oneindia' या विविध भाषांमध्ये बातम्या आणि माहिती देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने मोठी घोषणा केली.
Oneindia
OneindiaDainik Gomantak
Published on
Updated on

'Oneindia' या विविध भाषांमध्ये बातम्या आणि माहिती देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने मोठी घोषणा केली. त्यांनी तयार केलेल्या 'WISE' (Widely Intelligent Support Engine) या नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्मला आता अनेक मोठ्या प्रादेशिक वृत्त प्रकाशकांनी स्वीकारले आहे. 'टाईम्स केरळ', 'एएनएम न्यूज', 'तुपाकी न्यूज', 'न्यूज घंटे घंटे', 'ई मुहूर्त', आणि 'पुन्नागई मीडिया' यांसारख्या प्रसिद्ध संस्थांचा यात समावेश आहे. या सर्व संस्था आता 'Oneindia' च्या स्वतःच्या नेटवर्कसोबत मिळून 'WISE' चा वापर करणार आहेत.

'WISE' प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

'WISE' (वाईज) हे एक प्रकारचे नवीन सॉफ्टवेअर आहे, जे खास करुन वृत्त प्रकाशक आणि मोठ्या कंपन्यांसाठी तयार करण्यात आले आहे. याचे मुख्य काम म्हणजे वृत्त किंवा माहिती तयार करणे, ती सांभाळणे आणि मोठ्या प्रमाणात तिचा प्रसार करणे आहे. हा प्लॅटफॉर्म अत्याधुनिक 'एआय (AI) तंत्रज्ञान' वापरतो. हे तंत्रज्ञान (Technology) ऑटोमेशन, अनेक भाषांची समज आणि माणसाची देखरेख यांचा समन्वय साधते. यामुळे सामग्री तयार करण्याचे काम अधिक हुशारीने, कमी वेळेत आणि योग्य पद्धतीने होते.

Oneindia
State Bank of India FD Scheme: SBI ने ग्राहकांना पुन्हा दिली खूशखबर, 'या' योजनेत आता जबरदस्त फायद्यांसह...

संपादकीय टीमसाठी मोठे वरदान

'WISE' प्लॅटफॉर्ममुळे संपादकीय टीमचे काम खूप सोपे झाले आहे. अगदी बातमीची कल्पना मनात येण्यापासून ते ती प्रकाशित (Publish) करेपर्यंतचे काम काही मिनिटांत पूर्ण करणे आता शक्य आहे.

  • संस्कृती आणि भाषा समजते: 'WISE' मध्ये एआय-शक्ती असलेले 'वर्कफ्लो' (कामाची पद्धत) आहेत, जे केवळ भाषाच नव्हे, तर त्या भाषेचा संदर्भ आणि स्थानिक सांस्कृतिक बारकावेही अचूकपणे ओळखतात.

  • सर्व काम आपोआप: हा प्लॅटफॉर्म सध्याच्या वृत्त व्यवस्थापन प्रणालींशी (CMS) सहज जोडला जातो आणि तो कामाचे शेवटपर्यंतचे ऑटोमेशन (End-to-end automation) करतो.

  • उदाहरणे: कीवर्ड रिसर्च, एसईओ (SEO) म्हणजे सर्च इंजिनसाठी लेख योग्य करणे, लेख तयार करणे, फोटो बनवणे आणि व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिणे - ही सर्व कामे तो आपोआप करतो.

Oneindia
Banking System: SBI-HDFC-ICICI बँक ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी, बँकिंग व्यवस्था...!

133 भाषांमध्ये अचूकता

'WISE' प्लॅटफॉर्मची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची बहुभाषिक (Multilingual) क्षमता. हा प्लॅटफॉर्म तब्बल 133 भाषांमध्ये काम करु शकतो. यामुळे प्रकाशकांना वेगवेगळ्या प्रदेशांतील प्रेक्षकांसाठी त्यांच्या भाषेनुसार, अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणे सोपे झाले आहे. या नवीन भागीदारींमुळे हे सिद्ध होते की, 'WISE' हे डिजिटल प्रकाशनासाठी एक विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेले एआय साधन आहे. गुणवत्ता आणि प्रेक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी आता अनेक प्रकाशक जबाबदारीने या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

Oneindia
Banking System: SBI-HDFC-ICICI बँक ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी, बँकिंग व्यवस्था...!

'WISE' च्या निर्मितीमागील कल्पना

'Oneindia' चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आणि 'WISE' चे जनक टोनी थॉमस (Tony Thomas) यांनी सांगितले की, "WISE चा जन्म 'बोर्ड रुम'मध्ये नव्हे, तर आमच्या वृत्त संस्थेच्या न्यूज रुममध्ये झाला आहे. त्यामुळे डिजिटल प्रकाशनाच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठीच आम्ही ते तयार केले आहे."

ते पुढे म्हणाले, "संपादक, लेखक आणि क्रिएटर्संना दररोज होणारा गोंधळ आणि अडचणी दूर करणे, हा यामागचा उद्देश होता. हे एआय एका टीममेटसारखे विचार करते, योजना बनवते आणि काम पूर्ण करते. हे केवळ ऑटोमेशन नाही, तर सर्जनशील लोकांना सक्षम बनवणारे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सर्जनशीलता आणि संगणकीय शक्तीचा समन्वय साधून, कोणत्याही भाषेत अधिक जलद, प्रभावी आणि अर्थपूर्ण कथा तयार करण्यास मदत करत आहे, तेही सत्यता आणि नियंत्रणात कोणताही बदल न होता."

Oneindia
Finance Minister on Bank Privatisation: मोठी बातमी, SBI वगळता 'या' सर्व बँका होणार Private; सरकारने जारी केली यादी

वापरकर्त्याचा अनुभव

'टाईम्स केरळ'चे व्यवस्थापकीय संपादक जिथिन राज आर. (Jithin Raj R) यांनी या प्लॅटफॉर्मचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्याने दिलेल्या माहितीला अचूकतेने समजून घेतो आणि त्यानुसार उच्च-गुणवत्तेची सामग्री देतो. मोठे काम कमी वेळेत करण्याची त्याची क्षमता कोणत्याही संस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे, ज्यांना उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढवायची आहे. त्यामुळे, कामाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी WISE चा वापर करण्याची माझी शिफारस आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com