IRCTC Onam Special Train: बघता येणार केरळ गोवा, दिल्ली, स्टॅच्यू ऑफ युनिटी...

आयआरसीटीसीच्या (IRCTC) भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनने भारतातील (India) प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेनची (Special Train) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
IRCTC Onam Special Train
IRCTC Onam Special TrainDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Onam Special Bharat Darshan: आयआरसीटीसीच्या (IRCTC) भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनने भारतातील (India) प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेनची (Special Train) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंडियन रेल्वे (Indian Railway) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ओणम स्पेशल (Onam Special) भारत दर्शन एक्सप्रेस केरळ टूर पॅकेज ऑफर करत आहे.

ज्यामध्ये गोवा, गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, जयपूर, दिल्ली, आग्रा आणि हैदराबाद या ठिकाणच्या प्रेक्षणिय स्थळांचा समावेश असणार आहे. ही विशेष ट्रेन 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 12:05 वाजता मदुराई रेल्वे स्थानकावरून सुटेल. 11 रात्री आणि 12 दिवसांच्या टूर पॅकेजसाठी, प्रवासी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा महामंडळाच्या पर्यटक सुविधा केंद्र, प्रादेशिक आणि झोनल कार्यालयांद्वारे ऑनलाईन तिकिटे बुक करू शकतात. हे टूर पॅकेज प्रत्येक प्रवाशाला12 हजार रुपयांमध्ये दिले जाणार आहे.देश

IRCTC Onam Special Train
काय आहे WhatsApp चे नविन ‘View Once’ फिचर्स?

हे असणार दौऱ्याचे बोर्डिंग पॉईंट्स

IRCTCच्या वेबसाइटनुसार, या दौऱ्याचे बोर्डिंग पॉईंट्स मदुराई, कोल्लम, त्रिवेंद्रम सेंट्रल, कोट्टायम, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, शोरनूर जंक्शन, कन्नूर, कोझीकोड आणि कासारगोड आहेत. डी-बोर्डिंग पॉईंट्स म्हणजे रेनिगुंटा जंक्शन, काटपाडी जंक्शन, सलेम जंक्शन, जोलारपेट्टाई, इरोड जंक्शन, पलक्कड, पोदानूर जंक्शन, ओट्टापालम, एर्नाकुलम, त्रिशूर, कोट्टायम, कोल्लम जंक्शन, तिरुनेलवेली, त्रिवेंद्रम सेंट्रल आणि मदुराई.

प्रवासादरम्यान अशा असणार सुविधा

IRCTCओणम स्पेशल भारत दर्शन केरळ टूर पॅकेजमध्ये स्लीपर क्लास ट्रेनची तिकिटे, रात्रीचा मुक्काम/धर्मशाळा/हॉलमध्ये मल्टी शेअरिंग, सकाळचा चहा किंवा कॉफी, नाश्ता, दुपारचे जेवण, एक लिटर पिण्याचे पाणी यासह जेवण यांचा समावेश असेल. प्रति व्यक्ती बाटली प्रति दिन, प्रवास विमा, एसआयसी तत्त्वावर नॉन-AC प्रवास , टूर एस्कॉर्ट आणि ट्रेनमध्ये सुरक्षा.

त्यानंतर, टूर पॅकेजमध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या वस्तू अर्थात औषधे, कपडे धुणे इ., टूर गाईडची सेवा, स्मारकांसाठी प्रवेश शुल्क आणि पॅकेजच्या समावेशामध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व गोष्टींचा समावेश होणार नाही.

IRCTC Onam Special Train
COVID-19: केरळ तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

15 दिवसांआधी टूर रद्द करण्याचा विचार असल्यास...

15 दिवसांआधी टूर रद्द करण्याच्या विचार असल्यास बुकिंग तिकिटातून 250 रुपये कापले जातील. 8 ते 14 दिवसांच्या आत रद्द केल्यास, खर्चाच्या 25% वजा केले जाईल. 4 ते 7 दिवसांच्या आत रद्द केल्यास, 50% वजा केले जाईल. चार दिवसांपेक्षा कमी वेळात बुकिंग रद्द झाल्यास पैसे परत मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com