Manipur Violence: आणखी दोन मुलींवर बलात्कार, जमावाने केली निर्घृण हत्या

Manipur Violence: हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमधून महिलांवरील क्रूरता आणि अत्याचाराची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे.
Manipur Violence
Manipur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Violence: हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमधून महिलांवरील क्रूरता आणि अत्याचाराची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे.

या घटनेबाबत सांगितले जात आहे की, या दोन मुलींचीही हत्या करण्यात आली कारण त्या कुकी आदिवासी समुदायाच्या होत्या. दुसरीकडे, पोलिसांनी या घटनेसंबंधी गांभीर्य दाखवले नाही. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला.

दरम्यान, ही घटना इम्फाळमधील कोनुंग मामांग येथे घडली. 21 ते 24 वयोगटातील मुलींना जमावाने लक्ष्य केले. या मुली गाड्या धुण्याची कामे करायच्या. या दोन मुलींवर (Girl) काही महिलांसह पुरुषांच्या मोठ्या गटाने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, गर्दीतील महिलांनी पुरुषांना पीडितेला एका खोलीत नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. दोन्ही मुलींना खोलीत ओढून नेण्यात आले, दिवे बंद केले आणि ओरडू नये म्हणून त्यांचे तोंड कापडाने बांधले.

सुमारे दीड तास हा भीषण अत्याचार सहन केल्यानंतर पीडितांना ओढत बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्यांचे कपडे फाटले होते, केस कापले होते आणि शरीर रक्ताने माखले होते.

Manipur Violence
Manipur Violence: "इथून चालते व्हा..." मिझोराममधील मैतई समुदयाला धमक्या; मणिपूर घटनेचा परिणाम

दुसरीकडे, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मणिपूर पोलिस सध्या शस्त्रे हिरावून नेणे, जाळपोळ, खून आणि महिलांवरील हल्ल्यांसह विविध गुन्ह्यांशी संबंधित हजारो तक्रारींचा तपास करत आहेत.

दोन कार्यकर्त्यांनी आणि नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशनने केलेल्या तक्रारीत या घटनांची नोंद राष्ट्रीय महिला आयोगाकडेही करण्यात आली आहे.

हिंसाचाराला तोंड देण्याची तयारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर हिंसाचार प्रकरणात 6000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्यामध्ये 70 प्रकरणे खुनाशी संबंधित आहेत. 700 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याचबरोबर पॅरा मिलिटरीच्या 123 कंपन्या सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या आहेत. 62 कंपन्यांचे 6 हजार 200 CRPF जवान तैनात आहेत. 12 हजार अतिरिक्त निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

मणिपूरचे (Manipur) पोलीस कर्मचारी 24 तास लक्ष ठेवून आहेत. मात्र मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात राज्य सरकारसह केंद्रीय सुरक्षा दल अपयशी ठरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com